• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. mukesh ambani gautam adani radhakishan damani top 10 richest people in india as of january 2025 forbes india list sjr

‘हे’ आहेत देशातील टॉप १० सर्वात श्रीमंत व्यक्ती; जानेवारी २०२५ च्या यादीत अदानी – अंबानी कितव्या क्रमांकावर?

India Rich List: जानेवारी २०२५ मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत १० व्यक्तींची यादी जारी करण्यात आली आहे.

January 13, 2025 16:00 IST
Follow Us
  • नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच फोर्ब्सने जानेवारी २०२५ पर्यंत जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी जारी केली आहे. या यादीतील टॉप १० श्रीमंत भारतीयांची नावे आज आपण पाहाणार आहोत.
    1/11

    नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच फोर्ब्सने जानेवारी २०२५ पर्यंत जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी जारी केली आहे. या यादीतील टॉप १० श्रीमंत भारतीयांची नावे आज आपण पाहाणार आहोत.

  • 2/11

    रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे यादीतील पहिले भारतीय ठरले आहेत. तर जागतिक क्रमवारीत त्यांचा १८ वा क्रमांक लागतो. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष असण्याबरोबर ते व्यवस्थापकीय संचालकही आहेत.

  • 3/11

    फोर्ब्सच्या यादीनुसार, गौतम शांतीलाल अदानी यांचा सर्वात श्रीमंत यादीत २५ वा क्रमांक आहे, अदानी समुहाचे संस्थापक असलेल्या गौतम अदानी यांची संपत्ती जवळपास ६२.३ अब्ज डॉलर इतकी आहे.

  • 4/11

    शिव नाडर हे ४२.१ अब्ज डॉलर संपत्तीचे मालक आहेत. फोर्ब्सच्या श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचा ३७ वा क्रमांक लागतो. ते एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. याशिवाय ते शिव नाडर फाउंडेशनचे अध्यक्षही आहेत.

  • 5/11

    सावित्री देवी जिंदाल या एक भारतीय उद्योगपती आणि राजकारणी आहेत. त्या ओपी जिंदाल ग्रुपच्या चेअरपर्सन एमेरिटस आहेत. ज्या ३८. ५ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह श्रीमंत लोकांच्या यादीत ४१ व्या क्रमांकावर आहेत.

  • 6/11

    दिलीप सांघवी भारतातील अब्जाधीश उद्योगपती आहेत. सन फार्मास्युटिकल्सचे संस्थापक म्हणून ते देशातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत.२९.८ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह ते ५९ व्या क्रमांकावर आहेत.

  • 7/11

    सायरस एस. पूनावाला हे एक भारतीय अब्जाधीश उद्योगपती आहेत आणि सायरस पूनावाला समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत, ज्यात भारतीय बायोटेक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा समावेश आहे. त्यांची संपत्ती २२.२ अब्ज डॉलर इतकी असून ते श्रीमंतांच्या यादीत ८९ क्रमांकावर आहेत.

  • 8/11

    कुमार मंगलम बिर्ला हे देशातील ९२ क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती २१.४ अब्ज डॉलर इतकी आहे. भारतातील सर्वात मोठ्या समूहांपैकी एक असलेल्या आदित्य बिर्ला समूहाचे ते अध्यक्ष आहेत.

  • 9/11

    भारतीय रिअल इस्टेट कंपनी DLF चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल पाल सिंग जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत १०६ व्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या नावे १८.१ अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे.

  • 10/11

    रवी जयपुरिया हे भारतीय अब्जाधीश उद्योजक आणि RJ कॉर्पचे अध्यक्ष आहेत. RJ कॉर्प अंतर्गत, ते वरुण बेव्हरेजेसचे व्यवस्थापन करतात जे अमेरिकेबाहेरील पेप्सिकोच्या सॉफ्ट ड्रिंक ब्रँड्ससाठी सर्वात मोठे बॉटलिंग भागीदार आहे. वरुण बेव्हरेजेस व्यतिरिक्त देवयानी इंटरनॅशनलचा देखील आरजे कॉर्पमध्ये समावेश आहे. रवी जयपुरिया यांची एकूण संपत्ती १७.९ अब्ज डॉलर इतकी आहे. या संपत्तीसह ते श्रीमंतांच्या यादीत १०८ व्या क्रमांकावर आहे.

  • 11/11

    राधाकिशन शिवकिशन दमानी हे भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि गुंतवणूकदार आहेत. ते रिटेल चेन DMart चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. एकूण १५.८ अब्ज डॉलर संपत्तीच्या मालकीसह ते श्रीमंतांच्या यादीत १२९ व्या स्थानी आहेत.

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग फोटोTrending Photoमराठी बातम्याMarathi Newsमुकेश अंबानीMukesh Ambaniव्हायरल न्यूजViral News

Web Title: Mukesh ambani gautam adani radhakishan damani top 10 richest people in india as of january 2025 forbes india list sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.