-
डोनाल्ड ट्रम्प आज म्हणजेच २० जानेवारीला अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला देशातील आणि जगातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. (फोटो: रॉयटर्स)
-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक मानले जातात. अशा परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांना अनेक सुविधांसोबतच मोठा पगारही मिळणार आहे. (फोटो: डोनाल्ड ट्रम्प/एफबी)
-
बीबीसीच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना दरवर्षी ४.४ लाख डॉलर्स (भारतीय रुपयात हे ३ कोटी ८० लाख ५८ हजार ९५८ भारतीय रुपये) दिले जातात. (फोटो: रॉयटर्स)
-
याशिवाय अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना ५० हजार डॉलर्स (सुमारे ४३ लाख रुपये) खर्च भत्ताही मिळतो. त्याच वेळी, जर या खर्च भत्त्याचा कोणताही भाग वापरला गेला नाही, तर ती रक्कम यूएस ट्रेझरीमध्ये परत जाते. (फोटो: रॉयटर्स)
-
त्याच वेळी, हा खर्च भत्ता राष्ट्रपतींच्या एकूण उत्पन्नात समाविष्ट केला जात नाही. (फोटो: रॉयटर्स)
-
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना मनोरंजन, कर्मचारी आणि स्वयंपाकासाठी दरवर्षी १९ हजार डॉलर (सुमारे १६ लाख रुपये) मिळतात. (फोटो: डोनाल्ड ट्रम्प/एफबी)
-
व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश केल्यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना एक लाख डॉलर (सुमारे ८६ लाख रुपये) मिळतात. (फोटो: डोनाल्ड ट्रम्प/एफबी)
-
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सर्व आरोग्य सेवा मोफत आहेत. तसेच प्रवासासाठी एक लिमोझिन कार, एक सागरी हेलिकॉप्टर आणि एअर फोर्स वन नावाचे विमान देखील दिले जाते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
लिमोझिन कार आधुनिक सुरक्षा आणि संचार प्रणालींनी सुसज्ज असते. त्याचबरोबर एअरफोर्स वनच्या विमानात सुमारे चार हजार चौरस फूट जागा उपलब्ध आहे. वायुसेनेचे हे अत्यंत सुरक्षित विमान मानले जाते आणि ते फ्लाइंग कॅसल आणि फ्लाइंग व्हाईट हाऊस म्हणूनही ओळखले जाते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
याशिवाय अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना इतरही अनेक सुविधा मिळतात. (फोटो: रॉयटर्स) हेही पाहा- Bigg Boss 18 चा विजेता करणवीर मेहराचं शिक्षण ते नावातील बदल, त्याच्याबद्दलच्या खास गोष्टी जाणून घ्या…
भरघोस पगार, लिमोझिन कार ते ‘फ्लाईंग व्हाईट हाऊस’पर्यंत, डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार ‘या’ सुविधा…
Donald Trump per month Salary and Facilities: अध्यक्ष बनताच डोनाल्ड ट्रम्प यांना करोडोंच्या पगारासह अनेक सुविधा मिळतील.
Web Title: Us 47th president donald trump salary flying white house limousine car security and facility spl