-
अब्जावधींचं दान करणारे धर्मगुरु आगा खान (चौथे) यांचं निधन झालं आहे. (Photo: Indian Express)
-
वयाच्या ८८ व्या वर्षी लिस्बन या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Photo: X)
-
आगाखान चौथे हे यशस्वी उद्योजक होते आणि दानशूर वृत्तीचे होते. (Photo: Indian Express)
-
त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी अनेक मोठी पावले उचलली. आगा खान यांचे उत्तराधिकारी म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे हे देखील आता समोर आले आहे. त्यांच्याकडे किती संपत्ती होती? याबद्दल जाणून घेऊयात. (Photo: Indian Express)
-
आगा खान चौथे यांच्या निधनानंतर, प्रिन्स रहीम अल-हुसैनी यांची इस्माईली समुदायाचे ५० वे धर्मगुरू म्हणून निवड करण्यात आली आहे. (Photo: X)
-
माध्यमांतील माहितीनुसार, आगा खान यांच्याकडे एकूण संपत्ती १३.३ अब्ज डॉलर्स होती. यामधील बहूतांश संपत्ती त्यांना वारशातून मिळालेली आहे. एवढेच नाही तर त्यांच्याकडे एक खाजगी जेट, २०० दशलक्ष डॉलर्सची बोट आणि बहामासमध्ये एक खाजगी बेट देखील आहे. (Photo: Indian Express)
-
त्यांची मालमत्ता जगभरात आढळून येते. तसेच त्यांच्याकडे अनेक देशांचे नागरिकत्व होतं. (Photo: X)
-
दरम्यान, दानशूर वृत्तीच्या आगा खान यांनी भारताला पुण्यामधील आगा खान पॅलेस दान दिला होता, त्यांच्या पुर्वजांनी १८९२ मध्ये बांधलेला हा राजवाडा महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांचं स्मारक म्हणून १९६९ मध्ये भारताला दान केला गेला. (Photo: Thinkstock)
-
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगा खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. (Photo: X) हेही पाहा-जगातील सर्वात धोकादायक तुरुंग; एका दिवसात झालेला ६२ जणांचा मृत्यू, पुन्हा का आला चर्चेत?
दानशूर अब्जाधीश आगा खान अफाट संपत्तीचे होते मालक, त्यांचं पुणे कनेक्शन काय?
Aga Khan Net Worth : त्यांची मालमत्ता जगभरात आढळून येते. तसेच त्यांच्याकडे अनेक देशांचं नागरिकत्व होतं.
Web Title: Know the details of aga khan net worth and pune palace connection spl