-
मुघलांनी भारतावर ३०० वर्षांहून अधिक काळ राज्य केले. बाबरने भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केली. मुघल साम्राज्याबद्दल अनेक गोष्टी प्रचलित आहेत पण लोक एका मुघल सम्राटाला पंडितही म्हणत असत . तो कोण होता आणि त्याचा शिरच्छेद करून त्याची दिल्लीमध्ये धिंड काढली. याबद्दलच जाणून घेऊयात… (Photo: Microsoft bing AI Image)
-
खरं तर आपण दारा शिकोहबद्दल बोलत आहोत, ज्याला मुघल दरबारामध्ये अनेकजण पंडितजी म्हणत. दारा शिकोह हा मुघल साम्राज्याचा पाचवा सम्राट शाहजहान याचा मोठा मुलगा होता. (Photo: Microsoft bing AI Image)
-
दारा शिकोहला राज्यकारभामध्ये फारसा रस नव्हता. इस्लाम व्यतिरिक्त त्याने इतर अनेक धर्मांचा अभ्यास केला. विशेषतः त्याने हिंदू धर्माशी संबंधित ग्रंथांचं खोलवर वाचन केलं. (Photo: Microsoft bing AI Image)
-
दारा शिकोहने उपनिषद आणि इतर हिंदू धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला. एवढेच नाही तर अनेक हिंदू धर्मग्रंथांचे पर्शियन भाषेत भाषांतरही केले. त्याच्या या निर्णयावर अनेक मुस्लिम धार्मिक नेते नाराज होते. (Photo: Pinterest)
-
दरबारातील मुस्लिम मातब्बर पदाधिकारी त्याच्यावर रागावले असताना, तो हिंदूंशी जवळीक साधू लागला. यामुळे लोक त्याला पंडितजी अशा नावाने हाक मारायला लागले. (Photo: Microsoft bing AI Image)
-
दारा शिकोहला सत्तेत रस नव्हता पण तरीही त्याची बुद्धिमत्ता पाहून शाहजहान त्याला राजा बनवू इच्छित होता. (छायाचित्र: Pinterest)
-
शाहजहानचा धाकटा मुलगा औरंगजेब मात्र या निर्णयावर खूश नव्हता. त्याला वाटले की जर दारा शिकोह राजा झाला तर इस्लाम धोक्यात येईल. (Photo: Microsoft bing AI Image)
-
दारा शिकोहचा असा विश्वास होता की ज्ञानासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सत्याचा शोध. दाराने हिंदू आणि मुस्लिम धर्मांच्या मेळाव्यांना मजमा उल बहरीन (दोन समुद्रांचे मिलन) असे नाव दिले. (Photo: Pinterest)
-
त्याचे वडील शाहजहान त्याच्या समजूतदारपणा आणि बुद्धिमत्तेने प्रभावित झाले. त्यांना वाटले की दारा शिकोहला भारत समजतो आणि तो देशावर राज्य करण्यासाठी एक चांगला दावेदार आहे. (Photo: Pinterest)
-
जर औरंगजेबऐवजी दारा शिकोह मुघल सल्तनतचा राजा झाला असता तर देशाची स्थिती पूर्णपणे वेगळी असती, असे इतिहासकार आणि विचारवंत सांगतात. (Photo: Pinterest)
-
दारा शिकोहचे हिंदू धर्माशी असलेले प्रेम त्याचा धाकटा भाऊ औरंगजेब याला त्रास देत होते. १६५८ मध्ये सामुगडच्या लढाईत दारा शिकोहचा पराभव झाला तेव्हा त्याने अफगाणिस्तानातील दादर येथे आश्रय घेतला. पण इथे त्याचा विश्वासघात झाला आणि औरंगजेबाच्या आदेशानुसार, त्याला साखळदंडांनी बांधण्यात आले, अपमानित करण्यात आले आणि हत्तीवर बसून शाही राजधानीच्या रस्त्यांवर फिरवण्यात आले. (Photo: Microsoft bing AI Image)
-
फ्रेंच इतिहासकार फ्रँकोइस बर्नियर यांनी त्यांच्या ‘ट्रॅव्हल्स इन मुघल इंडिया’ या पुस्तकात लिहिले आहे की दाराला एका लहान हत्तीवर उघड्या हावड्यामध्ये बसवण्यात आले होते. त्याच्या मागे, त्याचा १४ वर्षांचा मुलगा सिफिर शिकोह दुसऱ्या हत्तीवर बसला होता. त्या दोघांच्याही मागे औरंगजेबाचा गुलाम नजरबेग होता. त्याच्या हातात तलवार होती, दारा पळून गेला तर त्याचा शिरच्छेद करण्याचा आदेश नजरबेगला देण्यात आला होता. (Photo: Microsoft bing AI Image)
-
दारा शिकोहला अगदी साध्या कपड्यांमध्ये त्या ठिकाणांवर नेण्यात आले जिथे त्याचा दबदबा होता, त्याला लोक मानत होते. त्यानंतर एक दिवसानंतर, औरंगजेबाने दारा शिकोहला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. (Photo: theheritagelab)
-
त्याच्यावर इस्लामला विरोध केल्याचा आरोप होता. औरंगजेबाने नजरबेगला दारा शिकोहचा शिरच्छेद करण्याचा आदेश दिला. यानंतर, औरंगजेबाने दारा शिकोहचे छाटलेले मुंडके संपूर्ण दिल्लीत फिरवण्याचा आदेश दिला. (Photo: Pinterest)
-
औरंगजेबाने केवळ दारा शिकोहलाच नव्हे तर त्याचे वडील शाहजहान यांनाही कैद केले होते. शाहजहान आठ वर्षे तुरुंगात राहिला आणि याच काळात त्याचा मृत्यू झाला. (Photo: mfa.org)हेही पाहा- छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘शिवनेरी’चा इतिहास काय? किल्ल्याने पाहिल्या ‘या’ राजवटी…
हिंदूंमध्ये ‘पंडित’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ‘या’ मुघल राजपुत्राला कोणी सुनावला होता मृत्युदंड?
Which Mughal prince did people call Pandit ji: मुघल सल्तनतचा एक राजपुत्र होता ज्याला लोक पंडित म्हणत असत. पण या राजकुमाराला त्याच्याच भावाने कैद केले होते.
Web Title: Which mughal prince did people call pandit ji brother imprisoned cut off his head and paraded it in delhi spl