• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. summer travel tips best place for tours in uttar pradesh kanpur gives goa a tough fight in low budget tour spl

भारतातील ‘हे’ ठिकाणही गोव्याला टक्कर देते, येथे तुम्हाला कमी बजेटमध्ये उत्तम साहसी खेळांचा आनंद घेता येईल…

आज आम्ही तुम्हाला अशा एका शहराबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही गंगेच्या लाटांवर पॅरासेलिंगसह अनेक पाण्याल्या साहसी खेळांचा आनंद घेऊ शकता.

Updated: May 20, 2025 18:36 IST
Follow Us
  • This place in India also rivals Goa, where you can enjoy great adventure sports on a low budget...
    1/9

    Summer travel tips : जर तुम्ही बऱ्याच काळापासून सहलीचे नियोजन करण्याचा विचार करत असाल आणि तिथे साहसी उपक्रमही करू इच्छित असाल, तर तुमच्या मनात सर्वात पहिले विचार येतात ते म्हणजे मुंबई आणि गोवा. (photo- freepik)

  • 2/9

    गोवा हे एक पर्यटन स्थळ आहे जिथे भेट देण्यासाठी चांगले बजेट आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला उत्तर प्रदेशातील एका शहराबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही भेट देऊ शकता. इथे तुम्ही साहसी पॅरासेलिंगचा आनंद देखील घेऊ शकता. (photo- pixels)

  • 3/9

    best tourist place in uttar Pradesh, Kanpur : आपण ज्या उत्तर प्रदेशातील शहराबद्दल बोलत आहोत त्याचे नाव कानपूर आहे. गंगा नदीच्या काठावर वसलेले हे शहर जगभरात त्याच्या सांस्कृतिक महत्त्वासाठी देखील ओळखले जाते आणि येथे अनेक मंदिरे आणि धार्मिक स्थळे आहेत, जी पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येतात. (photo- freepik)

  • 4/9

    कानपूरमध्ये तुम्हाला मुंबई आणि गोव्यासारखे वातावरण पाहायला मिळणार नाही, पण जर तुम्हाला पॅरासेलिंगला जायचे असेल तर तुम्हाला येथे संधी मिळेल. (photo- pixels)

  • 5/9

    कानपूरमधील गंगा बॅरेज येथील बोट क्लबमध्ये पॅरासेलिंग सुरू करण्यात आले आहे. जिथे तुम्हाला मुंबई आणि गोव्यातील साहसी उपक्रमांसारखाच सेम अनुभव मिळेल. (photo- freepik)

  • 6/9

    जर तुम्हाला पॅरासेलिंगला जायचे असेल आणि गोव्याला जाण्यासाठी बजेट नसेल, तर तुम्ही येथे जाऊन या साहसी उपक्रमाचा आनंद घेऊ शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की येथे तुम्ही गंगेच्या लाटांवरून उडू शकता. (photo- freepik)

  • 7/9

    काही दिवसांपूर्वी कानपूर बोट क्लबमध्ये वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यात आले होते, त्यानंतर हे ठिकाण साहस प्रेमींसाठी एक आवडते ठिकाण बनले आहे. (photo- pixels)

  • 8/9

    कानपूरमधील गंगा बॅरेज येथील बोट क्लबमध्ये प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली संपूर्ण सुविधांसह पॅरासेलिंग केले जाते. पॅरासेलिंग दरम्यान, एका वेळी फक्त दोनच लोक उड्डाण करू शकतात आणि उड्डाण 80 मीटर उंचीपर्यंत होते. त्याच वेळी, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बोटीवर तीन प्रशिक्षित कर्मचारी उपस्थित असतात. (photo- freepik)

  • 9/9

    पॅरासेलिंग व्यतिरिक्त, तुम्ही कानपूरमधील गंगा बॅरेज येथे असलेल्या बोट क्लबमध्ये मोटर बोट आणि पोंटून बोट राईड्सचा आनंद घेऊ शकता. मीडिया रिपोर्ट्सनुलार येथे, येत्या काही दिवसांत पर्यटकांना जेट स्की बोटींचा आनंद घेण्याची संधी देखील मिळू शकते. (photo- freepik)

TOPICS
ट्रॅव्हल डेस्टिनेशनTravel Destinationट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending News

Web Title: Summer travel tips best place for tours in uttar pradesh kanpur gives goa a tough fight in low budget tour spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.