-
इराणी बुद्धिबळपटू सारा खादेम केवळ तिच्या खेळासाठीच नाही तर तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस शैलीसाठीही चर्चेत असते. चला जाणून घेऊ तिच्या खेळाबद्दल आणि तिने स्वत:च्याच देशाबरोबर केलेल्या संघर्षाबद्दल…
-
ग्लॅमरस
सारा खादेम एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी ग्लॅमरस नाही, ती आता आईदेखील आहे तरीही तिने स्वतःला खूप फिट ठेवले आहे. -
धाडसी
सारा केवळ ग्लॅमरसच नाही तर खूप धाडसी देखील आहे. डिसेंबर २०२२ मध्ये तिने महिलांच्या हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी आवाज उठवला होता. -
आली होती चर्चेत
साराने केलेल्या एका धाडसी गोष्टीमुळे ती आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आली होती. -
हिजाब घातला नाही
साराने डिसेंबर २०२२ मध्ये कझाकिस्तान या ठिकाणी झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत हिजाब न घालता भाग घेतला होता. -
यानंतर इराणमधल्या कट्टरतावाद्यांनी तिचा निषेध केला होता कारण बाब इराणच्या इस्लामिक ड्रेसकोड नियमाच्या विरोधात होती. इराणमधे साराच्या विरोधात अटक वॉरंट लागू करण्यात आले होते.
-
स्पेनला गेली
त्यानंतर कारवाई टाळण्यासाठी सारा खादेम स्पेनला गेली होती. -
स्पॅनिश नागरिकत्व
जुलै २०२३ मध्ये तिला स्पॅनिश नागरिकत्व देण्यात आल्याची माहिती स्पेन सरकारच्या वतीने देण्यात आली. -
या गोष्टीला २ वर्षे झाली आहेत आणि सारा तिचा खेळातील प्रवास प्रगतीनिशी करत आहे.
-
लग्न
खादेमचा जन्म १९९७ मध्ये झाला. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिने २०१७ मध्ये चित्रपट निर्माता राधेशिर अहमदीशी लग्न केले आहे. -
‘मला पडद्यात रहायला…
स्पेनला गेल्यानंतर तिने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. त्यावेळी तिने म्हटलं होतं की ‘मला पडद्यात रहायला आवडत नाही. त्यामुळे मी आता यापुढे हिजाब घालणार नाही असा निर्णय घेतला आहे.’ -
सारा खादेम एका मुलाची आईही आहे पण फिटनेसच्या बाबतीत ती खूप तंदुरुस्त आहे. (सर्व फोटो साभार- सारा खादेम इन्स्टाग्राम) हेही पाहा- १५ व्या वर्षी ३९ वर्षीय शिक्षिकेच्या प्रेमात; कालांतराने तिच्याशीच केले लग्न, चित्रपटालाही लाजवेल अशी आहे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची प्रेमकथा…
Photos : इराणचं नागरिकत्व सोडून स्पेनला स्थायिक होणाऱ्या सुंदर बुद्धिबळपटूची संघर्षमय गोष्ट…
Sara khadem Iranian-Spanish Chess player: सारा खादेम एका मुलाची आईही आहे पण फिटनेसच्या बाबतीत ती खूप तंदुरुस्त आहे.
Web Title: Iran most beautiful chess player sara khadem photos why did she take spanish citizenship hijab protests spl