• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. how many times was emergency imposed in india indira gandhi spl

इंदिरा गांधींव्यतिरिक्त देशातल्या ‘या’ सरकारांनीही आणीबाणी लागू केली होती….

How many times emergency in India : इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात देशात आणीबाणी लागू करण्यात आली (१९७५), ज्याला भारताचा काळा दिवस म्हटले जाते. याआधीही देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती, पण तेव्हाची परिस्थिती इंदिरा गांधी सरकारसारखी नव्हती.

June 25, 2025 16:33 IST
Follow Us
  • How many times has emergency been imposed in India
    1/7

    बरोबर ५० वर्षांपूर्वी १९७५ साली २५-२६ जूनच्या मध्यरात्री आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात आणीबाणी लागू केली होती, या घटनेला लोक काळा दिवस मानतात. आणीबाणी लागू होताच विरोधक नेत्यांना अटक करण्यात आली, माध्यमांवर बंधन लादण्यात आली आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले.

  • 2/7

    मात्र, देशात आणीबाणी लागू होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. याआधीही देशात आणीबाणी होती, पण त्यावेळी इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये जे वातावरण होते, तसे वातावरण नव्हते.

  • 3/7

    आणीबाणी लागू झाल्यानंतर, लोकांचे मूलभूत अधिकार निलंबित करण्यात आले आणि सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना मिसा (MISA) म्हणजेच अंतर्गत सुरक्षा कायद्यांतर्गत तुरुंगात टाकण्यात आले. इंदिरा गांधी यांनी २१ महिन्यांसाठी आणीबाणी लागू केली होती पण आणीबाणीचा कालावधी सहा महिन्यांचा असतो.

  • 4/7

    इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील सरकारने १९७५ मध्ये आणीबाणी लागू करण्यापूर्वी देशात दोनदा आणीबाणी लागू करण्यात आली होती, परंतु दोन्ही वेळा त्यामागे ठोस कारणे होती.

  • 5/7

    भारतात एकूण तीन वेळा (१९६२, १९७१ आणि १९७५) आणीबाणी लागू करण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३५२ नुसार राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे.

  • 6/7

    देशात पहिल्यांदा २६ ऑक्टोबर १९६२ ते १० जानेवारी १९६८ दरम्यान आणीबाणी लागू करण्यात आली होती, त्या काळात देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते. त्यावेळी भारत आणि चीनमध्ये युद्ध सुरू असल्याकारणाने ‘भारताच्या सुरक्षेला बाह्य आक्रमणामुळे धोका असल्याचे घोषित करण्यात आले होते’.त्यामुळे ही आणीबाणी लादण्यात आली होती.

  • 7/7

    ३ ते १७ डिसेंबर १९७१ दरम्यान भारतात दुसऱ्यांदा आणीबाणी लागू करण्यात आली, या वेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होते आणि देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे लक्षात घेऊन आणीबाणी लागू करण्यात आली होती. व्ही.व्ही.गिरी हे तेव्हा देशाचे राष्ट्रपती होते. हेही पाहा –भारताशिवाय ‘या’ देशांकडेही आहे आणीबाणीची तरतूद; अंमलबजावणी प्रक्रिया काय असते?

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग न्यूजTrending News

Web Title: How many times was emergency imposed in india indira gandhi spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.