-
सध्या भारतासह संपूर्ण जग नासाच्या अॅक्सिओम-४ मोहिमेतून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचलेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या आनंद साजरा करत असताना, आणखी एका तरुण भारतीयाने इतिहास घडवला आहे.
-
आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील २३ वर्षीय जान्हवी डांगेती हिची अमेरिकेतल्या खाजगी अंतराळ संशोधन संस्थेने टायटन स्पेस इंडस्ट्रीज (TSI) भविष्यातील मोहिमेसाठी अंतराळवीर उमेदवार म्हणून निवड केली आहे.
-
२०२९ मध्ये होणाऱ्या टायटन्स स्पेसच्या पहिल्या मोहीमेत ५ तासांचं कक्षीय उड्डाण असणार आहे.
-
यामध्ये ती ३ तास शून्य गुरुत्वाकर्षणात राहील, ज्यामुळे वैज्ञानिक संशोधन आणि मानवी अंतराळ उड्डाण प्रगतीसाठी एक अद्वितीय वातावरण निर्माण होईल.
-
ही मोहीम पृथ्वीभोवती दोनदा प्रदक्षिणा घालेल म्हणजेच दोन सूर्योदय आणि दोन सूर्यास्त पाहणार आहे.
-
जान्हवीने तिचे शालेय शिक्षण गोदावरी येथून केले. तिचे आईवडील पद्मश्री आणि श्रीनिवास कुवेतमध्ये राहतात. ती पंजाबमधील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे.
-
२०२२ मध्ये, जान्हवीची पोलंडमधील क्राको येथील अॅनालॉग अॅस्ट्रोनॉट ट्रेनिंग सेंटर (AATC) ने निवड केली, ज्यामुळे ती सर्वात तरुण पहिली भारतीय परदेशी अॅनालॉग अंतराळवीर आणि म्हणून प्रसिद्ध झाली.
-
तिने नासाच्या इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल सर्च कोलॅबोरेशन (IASC) कार्यक्रमामध्ये देखील भाग घेतला आहे आणि हवाई पॅन-स्टार्स टेलिस्कोपमधील डेटाद्वारे लघुग्रह शोधण्यात योगदान दिले आहे.
-
जान्हवी डांगेतीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तिला नासा स्पेस अॅप्स चॅलेंजमध्ये पीपल्स चॉइस अवॉर्ड आणि इस्रो वर्ल्ड स्पेस वीकमध्ये यंग अचीव्हर अवॉर्ड मिळाला आहे. हे सन्मान अंतराळ क्षेत्रातील एक नवी तरुण शक्ती म्हणून तिची वाढती प्रतिष्ठा दाखवतात. (सर्व फोटो साभार- जान्हवी डांगेती इन्स्टाग्राम) हेही पाहा- Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ मंदिर कोणी आणि कधी बांधले? मंदिराशी संबंधित ‘ही’ रहस्ये तुम्हाला आश्चर्यचकित करतील…
शुभांशू शुक्लानंतर भारताच्या २३ वर्षीय जान्हवी डांगेतीने रचला इतिहास; २०२९ च्या मोहिमेसाठी झाली निवड, तिचं शिक्षण किती? कशी असेल मोहिम?
२०२९ मध्ये होणाऱ्या अंतराळ मोहिमेसाठी आंध्रप्रदेशच्या २३ वर्षीय जान्हवी डांगेतीची निवड झाली आहे. टायटन स्पेस इंडस्ट्रीजच्या खाजगी संशोधन संस्थेची ही मोहिम आहे. चला तिच्याबद्दल जाणून घेऊयात…
Web Title: Who is janhavi dangeti who selected for titans space 2029 mission whats her education shubhanshu shukla space astronaut spl