-
भारतातील सर्वात उंच टॉवर कोणते आहेत माहितीये का? कमालीची गोष्ट म्हणजे हे सगळे ७ टॉवर्स मुंबईत आहेत… चला पाहूयात कोणते आहेत हे टॉवर्स…
-
पॅलेस रॉयल
वरळीमधले हे ८८ मजल्यांचे व ३२० मीटर उंच ‘पॅलेस रॉयल’ टॉवर आहे. त्याचे बांधकाम अद्याप सुरू आहे, ते पूर्ण झाल्यावर भारतातील सर्वात उंच टॉवर बनणार आहे. (Photo: Twitter) -
लोखंडवाला मिनर्व्हा
३०१ मीटर उंच असलेली मिनर्व्हा ही मुंबईतील सर्वात नवीन उंच इमारत आहे. ७८ मजली असलेला हा ट्विन-टॉवर भारतातील सर्वात उंच पूर्ण झालेला गगनचुंबी टॉवर आहे, तो २०२३ मध्ये पूर्ण झाला आहे. (Photo: Twitter) -
पिरामल अरण्य अरव
अरण्य अरव हे भायखळा येथील २८२.२ मीटर उंच टॉवर असून त्यामध्ये ८३ मजले आहेत, याही दोन ट्विन इमारती आहेत आणि प्रकल्पाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. (Photo: Twitter) -
लोढा वर्ल्ड वन
लोढा वर्ल्ड वनची उंची २८०.२ मीटर आहे आणि त्यात ७६ मजले आहेत. ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच पूर्ण झालेली निवासी इमारत आहे. ती मुंबईतील वरळी येथे आहे. (Photo: Twitter) -
लोढा वर्ल्ड व्ह्यू
ही इमारत २७७.६ मीटर उंच आहे आणि त्यामध्ये ७३ मजले आहेत. ही इमारत मुंबईतील लोअर परळ येथे स्थित आहे आणि लोढा वर्ल्ड टॉवर्सचा एक भाग आहे. (Photo: Twitter) -
लोढा ट्रम्प टॉवर
लोढा ट्रम्प टॉवरची उंची २६८ मीटर (८७९ फूट) आहे. ही ७५ पेक्षा जास्त मजल्यांची गगनचुंबी इमारत आहे. ही इमारतही मुंबईतील वरळी परिसरात आहे आणि लोढा ग्रुपने बांधली आहे. (Photo: Twitter) -
ओंकार १९७३ टॉवर ए
या टॉवरची उंची २६७ मीटर आहे. हे मुंबईतील एक निवासी गगनचुंबी टॉवर आहे. या प्रकल्पात एकूण तीन टॉवर आहेत. (Photo: Twitter)
भारतातल्या सर्वात उंच इमारती मुंबईत आहेत; गगनचुंबी ७ टॉवर्सबद्दल सर्वकाही जाणून घ्या…
भारतातील सर्वात उंच टॉवर कोणते आहेत माहितीये का? कमालीची गोष्ट म्हणजे हे सगळे ७ टॉवर्स मुंबईत आहेत…
Web Title: Tallest buildings in india all situated in mumbai maharashtra spl