• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. what is navya scheme for girls from government of india skill development training know details spl

केंद्र सरकारनं मुलींसाठी आणलेली ‘नव्या’ योजना काय आहे? कसा करायचा अर्ज?

What Is Navya Yojana: महिला आणि बालविकास मंत्रालय आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने संयुक्तपणे ‘नव्या’ योजना सुरू केली आहे. ‘विकसित भारत २०४७’ च्या दृष्टीने हा एक विशेष प्रयत्न आहे.

Updated: July 1, 2025 16:01 IST
Follow Us
  • HSC Result 2025 Thane district records 93.74% in 12th exams; once again, girls outperform boys
    1/9

    Navya Scheme 2025, Navya Yojna for girls : देशातील मुलींना स्वावलंबी आणि कुशल बनवण्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव ‘नव्या’ आहे. (Photo: Indian Express)

  • 2/9

    ही योजना १६ ते १८ वयोगटातील मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश त्यांना अशा नोकऱ्यांमध्ये प्रशिक्षण देणे आहे ज्या नोकऱ्या आतापर्यंत सामान्यतः मुले किंवा पुरुषांशी संबंधित मानल्या जात होत्या. (Photo: Pexels)

  • 3/9

    नव्या योजनेची सुरुवात २४ जून रोजी उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातून झाली. हा एक प्रायोगिक प्रकल्प आहे. जो सध्या ९ राज्यांमधील २७ जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये ‘आकांक्षी जिल्हे’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रांचाही समावेश केला आहे. म्हणजेच जिथे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अधिक मदतीची आवश्यकता आहे. (Photo: Pexels)

  • 4/9

    नव्या योजनेअंतर्गत, मुलींना अशी व्यावसायिक कौशल्ये शिकवली जातील ज्यांची आजच्या काळात खूप मागणी आहे. (Photo: Pexels)

  • 5/9

    ज्यामध्ये ग्राफिक्स डिझायनिंग, ड्रोन असेंब्लींग, मोबाईल दुरुस्ती, सौर पॅनल बसवणे, सीसीटीव्ही बसवणे, स्मार्टफोन तंत्रज्ञ आणि मेकअप आर्टिस्ट सारख्या आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण यांचा समावेश आहे. (Photo: Pexels)

  • 6/9

    महिला आणि बालविकास मंत्रालय आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने संयुक्तपणे ‘नव्या’ योजना सुरू केली आहे. ‘विकसित भारत २०४७’ च्या दृष्टीने हा एक विशेष प्रयत्न आहे. (Photo: Pexels)

  • 7/9

    या योजनेचा लाभ त्या मुलींनाच मिळेल ज्यांनी किमान दहावी उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांचे वय १६ ते १८ वर्षांच्या दरम्यान आहे. (Photo: Pexels)

  • 8/9

    या योजनेसाठी सरकारने ७ तासांचे एक विशेष प्रशिक्षण मॉड्यूल तयार केले आहे. ते केवळ तांत्रिक प्रशिक्षणच देणार नाही तर संवाद कौशल्ये, उत्पन्न आणि खर्च समजून घेणे, कामाच्या ठिकाणी कसे वागावे आणि POSH आणि POCSO सारखे कायदेशीर अधिकार याबद्दल माहिती देखील देईल. जेणेकरून मुली व्यावसायिक जीवनासाठी पूर्णपणे तयार होऊ शकतील. (Photo: Pexels)

  • 9/9

    या योजनेसाठीची अधिकृत अर्ज प्रक्रिया अद्याप जाहीर केलेली नाही. याबद्दल सरकारकडून पुढील माहिती देताच याबद्दलची अर्ज प्रक्रिया सुरू होऊ शकते. दरम्यान, ही केवळ प्रशिक्षण योजना नाही तर मानसिकता बदलण्याचाही हा एक प्रयत्न आहे. आजही, अनेक ठिकाणी मुलींना फक्त पारंपारिक नोकऱ्यांपुरते मर्यादित मानले जाते. ‘नव्या’ योजना ही मानसिकता मोडण्याचा प्रयत्न करत आहे. (Photo: Pexels) हेही पाहा- शेफाली जरीवालाच्या घरी तपासादरम्यान सापडली ‘ही’ ३ औषधं; कशासाठी वापरली जातात?

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टॉपिकTrending Topicप्रकल्पProjectsमहिलाWomanमुलीGirls

Web Title: What is navya scheme for girls from government of india skill development training know details spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.