• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. 10 years of digital india this is how the country has changed pm narendra modi spl

‘डिजिटल इंडिया’ची १० वर्ष पूर्ण; या दशकात सरकारच्या कोणत्या निर्णयांनी कसे बदलले देशाचे चित्र? जाणून घ्या…

Digital India 10 Years: यामाध्यमातून देशाने काय आणि कशी प्रगती केली, नागरिकांचे जीवन कसे बदलले या काळात कोणते निर्णय घेण्यात आले आहेत, ते जाणून घेऊयात

July 2, 2025 12:55 IST
Follow Us
  • 10 years of Digital India
    1/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेल्या डिजिटल इंडिया मोहिमेला आता १० वर्ष पूर्ण झाली आहेत. (File Photo)

  • 2/10

    यामाध्यमातून देशाने काय आणि कशी प्रगती केली, नागरिकांचे जीवन कसे बदलले या काळात कोणते निर्णय घेण्यात आले आहेत, ते जाणून घेऊयात (File Photo)

  • 3/10

    यूपीआय डिजिटल पेमेंट
    भारतीयांच्या व्यवहारीक जीवनात डिजिटल पेमेंटमुळे मोठा बदल झाला आहे. यूनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणेजच यूपीआयच्या माध्यमातून आता ऑनलाईन पैसे पाठवणे व मिळवणे शक्य झाले आहे. भारतात आता यूपीआयद्वारे वर्षाला १०० अब्जांपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार होतात. जगभरात होणाऱ्या डिजिटल आर्थिक व्यवहारांमधले निम्मे व्यवहार भारतात होतात. (Photo: Pexels)

  • 4/10

    आधार कार्ड DBT
    आधार कार्ड DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) म्हणजे, सरकारी योजनांमधील लाभ थेट लाभार्थ्यांच्या आधार-लिंक्ड बँक खात्यात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आहे. याचा उद्देश सरकारी अनुदान आणि योजनांचा लाभ गरजूंपर्यंत जलद आणि पारदर्शकपणे पोहोचवणे आहे. आधारने डिजिटल ओळख अधिक विश्वासहर्य ठरली आहे. ई-केवायसी आणि सेवा वितरण सरळ आणि सुटसुटीत केले आहे. एप्रिल २०२५ पर्यत १४१.८८ कोटी आधार तयार झाले आहेत. (File Photo)

  • 5/10

    डीबिटी
    डीबीटी (DBT) म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (Direct Benefit Transfer). याचा अर्थ असा की, सरकारकडून मिळणाऱ्या सरकारी योजनांच्या लाभांच्या (सबसिडी) रकमा थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे. डीबीटीमुळे सरकारी योजनांच्या लाभांमधील गैरव्यवहार कमी होतात. थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) ४४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट नागरिकांना हस्तांतरित करण्यात आली आहे, ज्यामुळे मध्यस्थांची भूमिका संपुष्टात आली असून ३.४८ लाख कोटी रुपयांची गळती रोखली गेली आहे. (File Photo)

  • 6/10

    डिजिटल कनेक्शन्स
    २०१४ मध्ये २५ कोटी इंटरनेट कनेक्शन्स होती. आज ही संख्या वाढून ९७ कोटीपेक्षा जास्त झाली आहे. देशाच्या कोनाकोपऱ्यात ४२ लाख किलोमीटरपेक्षा जास्त लांब ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे विस्तारलेले आहे. ही लांबी पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील अंतराच्या अकरा पट आहे. तसेच भारताच्या ५जी नेटवर्कची व्याप्ती जगात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या व्याप्तींपैकी एक आहे. (File Photo)

  • 7/10

    आरोग्य आणि शिक्षण क्षेत्र
    डिजिटल इंडियाने आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात अनेक बदल घडवले आहेत. आरोग्यसेवेत, टेलिमेडिसिन आणि ऑनलाइन अॅप्समुळे ग्रामीण भागातील लोकांना चांगली आरोग्यसेवा मिळत आहे. शिक्षणात, ऑनलाइन शिक्षणामुळे भौगोलिक मर्यादा ओलांडून शिक्षण उपलब्ध झाले आहे, तसेच ‘दीक्षा’सारख्या ॲप्समुळे शिक्षण अधिक आकर्षक आणि सोपे झाले आहे. (File Photo)

  • 8/10

    डिजिटल साक्षरता
    पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाने (PMGDISHA) ६.३९ कोटी ग्रामस्थांना डिजिटल साक्षर करण्यात आले आहे. “कर्मयोगी भारत” पोर्टलवरुन १.०७ कोटी सामान्य सेवकांना डिजिटल प्रशिक्षण देण्यात आले आहे. (File Photo)

  • 9/10

    तंत्रज्ञान क्षेत्र
    भारत तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. माहिती तंत्रज्ञान (Information Technology), अवकाश संशोधन (Space Research), जैवतंत्रज्ञान (Biotechnology) आणि अक्षय ऊर्जा (Renewable Energy) यांसारख्या क्षेत्रात भारताने लक्षणीय प्रगती दर्शवली आहे. (File Photo)

  • 10/10

    संरक्षण क्षेत्रात ‘स्वदेशी’चा नारा
    भारताने गेल्या १० वर्षांमध्ये संरक्षण क्षेत्रात “स्वदेशी” चा नारा, “मेक इन इंडिया” किंवा “आत्मनिर्भर भारत” यांसारख्या सरकारी योजना पुढे आणल्या आहेत. याचा उद्देश देशांतर्गत उत्पादन वाढवणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आहे. (File Photo) हेही पाहा- केंद्र सरकारनं मुलींसाठी आणलेली ‘नव्या’ योजना काय आहे? कसा करायचा अर्ज?

TOPICS
ट्रेंडिंगTrendingडिजिटल इंडियाDigital Indiaनरेंद्र मोदीNarendra Modiमराठी बातम्याMarathi News

Web Title: 10 years of digital india this is how the country has changed pm narendra modi spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.