-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाना या देशाने त्यांचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. मोदी सध्या त्यांच्या ५ देशांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा तब्बल ५ आठवड्यांचा आहे.
-
दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आतापर्यंत अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत, जे त्यांचे जागतिक महत्त्व आणि प्रभाव दर्शवतात. त्यांनी आपल्या नेतृत्वाने भारताला जागतिक स्तरावर एक नवी ओळख तर मिळवून दिलीच, पण जगातील अनेक देशांकडून त्यांना उच्च सन्मान मिळाला आहे. चला तर मग जाणून घेऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०१४ ते २०२५ पर्यंत कोणत्या देशांनी कोणते पुरस्कार? देऊन सन्मानित केले आहे.
-
३ एप्रिल २०१६ रोजी पंतप्रधान मोदींना सौदी अरेबियाने ‘ऑर्डर ऑफ अब्दुलअजीज अल सौद’ने सन्मानित केले.
-
४ जून २०१६ रोजी पंतप्रधान मोदींना अफगाणिस्तानने ‘स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान’ पुरस्काराने सन्मानित केले.
-
१० फेब्रुवारी २०१८ रोजी पंतप्रधान मोदींना ‘ग्रँड कॉलर ऑफ स्टेट ऑफ पॅलेस्टाईन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-
८ जून २०१९ रोजी मालदीवने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ इज्जुद्दीन’ने सन्मानित केले.
-
२४ ऑगस्ट २०१९ रोजी पीएम मोदींना UAE द्वारे ‘ऑर्डर ऑफ झायेद’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-
२४ ऑगस्ट २०१९ रोजी, पीएम मोदींना बहरीनने ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्स’ने सन्मानित केले.
-
२१ डिसेंबर २०२० रोजी अमेरिकेने पंतप्रधान मोदींना ‘लीजन ऑफ मेरिट’ पुरस्काराने सन्मानित केले.
-
२२ मे २०२३ रोजी, फिजीने आपला सर्वोच्च नागरी सन्मान, ‘कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ प्रदान केला.
-
२२ मे २०२३ रोजी PM मोदींना पापुआ न्यू गिनी द्वारे ‘कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द पीपल’ ने देखील सन्मानित करण्यात आले.
-
२५ जून २०२३ रोजी पंतप्रधान मोदींना इजिप्तमध्ये ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ने सन्मानित करण्यात आले.
-
१४ जुलै २०२३ रोजी फ्रान्सने पंतप्रधान मोदींना ‘लीजन ऑफ ऑनर’ने सन्मानित केले.
-
२५ ऑगस्ट २०२३ रोजी ग्रीसने पंतप्रधान मोदींना ‘ग्रँड क्रॉस ऑर्डर ऑफ ऑनर’ने सन्मानित केले.
-
२४ मार्च २०२४ रोजी भूतानने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ द ड्रॅगन किंग’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले.
-
९ जुलै २०२४ रोजी रशियाने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू’ पुरस्काराने सन्मानित केले.
-
२ जुलै २०२५ रोजी घाना देशाने ‘द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ पुरस्काराने केले सन्मानित. (Photos Source: Reuters, ANI, Narendramodi/Twitter) हेही पाहा- जगातील ९ मोठ्या कंपन्यांचे सीईओ आहेत भारतीय; त्यांचे शिक्षण किती आहे माहितीये का?
PM Modi Award List : ११ वर्षांत १५ पुरस्कार, आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदींचा सन्मान; पाहा पुरस्कारांची संपूर्ण यादी…
PM Narendra Modi, International Honors Received by PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०१४ ते २०२५ पर्यंत कोणत्या देशांनी कोणते पुरस्कार? देऊन सन्मानित केले आहे, ते जाणून घेऊयात…
Web Title: Pm narendra modi ghana highest award prestigious awards given to narendra modi 2014 to 2025 all records spl