-
आजपासून अमरनाथ यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मंदिराकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांवरच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. पण या यात्रेला देशातील सर्वात कठीण यात्रा का मानले जाते ते तुम्हाला माहिती आहे का? (Photo: PTI)
-
या यात्रेला देशविदेशातून दरवर्षी हजारो यात्रेकरु हजेरी लावत असतात. श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने सांगितलेल्या माहितीनुसार ही यात्रा ३ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान असणार आहे. तसेच दररोज याठिकाणी १५ हजार यात्रेकरु येतील असा अंदाज आहे.
-
का करतात यात्रा?
जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथ पवित्र गुहेच्या दिशेने यात्रेकरू प्रवास करतात. (Photo: PTI) -
या ठिकाणी दरवर्षी महादेवाच्या पिंडिसारखे नैसर्गिक पद्धतीने बर्फाचे शिवलिंग तयार होते. यावर भाविकांची नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे त्याच्या दर्शनासाठी ही यात्रा केली जाते. (Photo: X)
-
ही यात्रा सर्वात कठीण का आहे?
अमरनाथ यात्रा ही भारतातील सर्वात कठीण यात्रा मानली जाते. समुद्रसपाटीपासून १२,७०० फूट उंचीवर असलेली ही यात्रा यात्रेकरूंच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शक्तीची परीक्षा पाहत असते. (Photo: Indian Express) -
यांनीच व्हावे सहभागी
१३ ते ७० वयोगटातले, ज्यांना हृदय, श्वसन किंवा इतर गंभीर आरोग्य समस्या नाहीत असेच भाविक या यात्रेत सहभागी होऊ शकतात. (Photo: Indian Express) -
गुहेकडे जाण्याचे मार्ग
अमरनाथ गुहेकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला आहे प्राचीन पहलगाम मार्ग, यावरचा प्रवास लांब पल्ल्याचा (४० किलोमीटर) आहे व या प्रवासात भाविकांना चित्तथरारक अनुभव येतो. (Photo: X) -
दुसरा मार्ग आहे सोनमर्गहून जाणारा बालटाल मार्ग. बालटाल ते अमरनाथ गुहेपर्यंतचा मार्ग १४ किलोमीटरचा आहे. हा मार्ग लहान असला तरी, त्यावर जास्त चढ-उतार आणि अवघड आहे. दरम्यान, २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये पाच दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बछुट गोळीबार केला, ज्यामध्ये २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. (Photo: Indian Express)
-
त्या घटनेमुळे अमरनाथमध्ये, जम्मू आणि काश्मीर पोलिसांसह सुमारे ५०,००० केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) जवान तैनात करून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. (Photo: Indian Express) हेही पाहा- वाईट काळात तुम्हाला चाणक्य नीतीतील ‘या’ गोष्टी देतील धीर; खुली होतील यशाची दारे…
Amarnath yatra 2025: अमरनाथ यात्रा भारतातली सर्वात कठीण यात्रा का आहे? जाणून घ्या…
Amarnath yatra 2025: आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे, या यात्रेला सर्वात कठिण यात्रा का मानले जाते ते तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग याचबद्दल जाणून घेऊयात…
Web Title: Why amarnath yatra is the most difficult pilgrimage in india reasons behind it spl