-
वार्षिक अमरनाथ यात्रेला २ जुलै २०२५ पासून सुरुवात झाली असून, पहिला भाविकांचा गट नुनवान आणि बालताल बेस कॅम्पवर पोहोचला आहे. श्रीनगरमधील नोंदणी केंद्रांवर भाविकांची गर्दी दिसून आली, तर सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहेत. यात्रेच्या प्रत्येक टप्प्यावर भक्तिभाव, उत्साह आणि कडक सुरक्षा व्यवस्थेचं वातावरण पाहायला मिळत आहे.
-
ही यात्रा सर्वात कठीण का आहे?
अमरनाथ यात्रा ही भारतातील सर्वात कठीण यात्रा मानली जाते. समुद्रसपाटीपासून १२,७०० फूट उंचीवर असलेली ही यात्रा यात्रेकरूंच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शक्तीची परीक्षा पाहत असते. (PTI Photo) -
आपण उंचीवर जाताना काय होते…
वातावरणातील ऑक्सिजन कमी होतो, आर्द्रता कमी होते, आपल्या हृदयाचे ठोके वाढतात, श्वसन दर वाढतो रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. दरम्यान, जास्त उंचावर गेल्यास आपले प्राणही जाऊ शकतात. चला जाणून घेऊयात याचबद्दल… (PTI Photo) -
अमरनाथ ट्रेक
या यात्रेमध्ये यात्रेकरूंना खूप थंडी, खूप कमी आर्द्रता, अतिनील किरणे आणि कमी हवेच्या दाबाचा सामना करावा लागतो. या कारणास्तव, उंचीवरच्या हवामानाशी जुळवून घेतल्याशिवाय यात्रेकरूंना ट्रेकिंग करण्याची परवानगी देण्यात येत नाही. म्हणूनच या यात्रेपूर्वी आरोग्य तपासणी करणेही आवश्यक आहे. -
जास्त उंचीवर काय होऊ शकते…
५,००० फूट वर गेल्यास आपल्याला श्वास घेण्यास त्रास होतो कारण की तिथेऑक्सिजनची पातळी कमी होते. (PTI Photo) -
६,६०० फुटांपेक्षा जास्त उंचीवर
या उंचीवर डोकेदुखी, थकवा, पोटाचे आजार, चक्कर येणे आणि झोपेचा त्रास होऊ शकतो. (PTI Photo) -
८,००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर
या उंचीवर गेल्यास आपल्याला अॅक्युट माउंटन सिकनेस (AMS) ही समस्या उद्भवू शकते याचा मेंदू आणि फुफ्फुसांवर परिणाम होऊ शकतो. (PTI Photo) -
१०,००० फूट उंचीवर
हायपोक्सिमिया (रक्तातील ऑक्सिजनची कमतरता) निर्णय क्षमता कमी होणे, काही प्रकरणांमध्ये भ्रम निर्माण होण्यासारख्या समस्याही होऊ शकतात. (PTI Photo) -
११,५००-१८,००० फूट उंचीवर
एवढ्या उंचावर गेल्यास व्यक्तीलीा हायपोक्सिमिया होऊ शकतो, लक्ष न दिल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. (PTI Photo) हेही पाहा- Amarnath yatra 2025: अमरनाथ यात्रा भारतातली सर्वात कठीण यात्रा का आहे? जाणून घ्या…
Amarnath Yatra 2025: १३ हजार फूट उंचीवर आहे अमरनाथ गुहा; एवढ्या वर गेल्यास ‘या’ समस्या उद्भवतात, प्राणही जाऊ शकतो…
अमरनाथ यात्रा ही भारतातील सर्वात कठीण यात्रा मानली जाते. समुद्रसपाटीपासून १२,७०० फूट उंचीवर असलेली ही यात्रा यात्रेकरूंच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शक्तीची परीक्षा पाहत असते
Web Title: Amarnath yatra is the most difficult pilgrimage what problems can arise if you go to high altitude spl