-
२५ जुलैपासून श्रावण महिना (Shravan Month) सुरू होणार आहे. या काळामध्ये देशभरातील महादेवाच्या मंदिरांमध्ये (Mahadev Temple) भाविकांची मोठी गर्दी असते. त्यापैकी अनेक प्राचीन मंदिरे (Ancient temples) आहेत, जिथे भाविकांची लांब रांग असते. (Photo: Pexels)
-
या मंदिरांपैकी एक म्हणजे तमिळनाडूतील तंजावर येथील बृहदेश्वर मंदिर (Brihadeeswara Temple) (Photo: Pexels)
-
खरंतर महादेवाचे बृहदेश्वर मंदिर हे प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. (Photo: Pexels)
-
हे मंदिर त्याच्या अद्भुत स्थापत्यकलेसाठी (Wonderful architecture) देखील जगप्रसिद्ध (World famous) आहे. (Photo: Pexels)
-
हे १००० वर्षांहून अधिक जुने मंदिर आहे, जे त्याच्या भव्यतेचे प्रतीक आहे. हे मंदिर ११ व्या शतकात चोल राजा, ‘राजराजा’ यांनी बांधले होते. (Photo: Pexels)
-
बृहदेश्वर मंदिराची काही रहस्ये (Secrets) जाणून घेऊयात… (Photo: Pexels)
-
घुमट
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात (UNESCO World Heritage Site) समाविष्ट असलेल्या या मंदिराचा घुमट (Dome) तब्बल ८० टन वजनाचा आहे. हे मंदिर हजारो वर्षात कित्येत भूकंप (Earthquake) सहन करूनही त्याच सुंदरतेने उभा आहे. हे मंदिर केवळ धार्मिकच (Religious) नाही तर ऐतिहासिक (historical) आणि सांस्कृतिक (Cultural) वारसा (heritage) देखील आहे, जे चोल राजवंशाची (Chol Kingdome) शक्ती आणि कला दर्शवते. (Photo: Pexels) -
अष्टकोनी शिखर
या मंदिराचे शिखर २५ टन वजनाचे आहे, ते अष्टकोनात घडवलेले (Octagonal peak) आहे आणि एकाच ग्रॅनाइट ब्लॉकवर (Granite block) बनवलेले आहे. (Photo: Pexels) -
द्रविड शैलीतील वास्तुकला
हे मंदिर द्रविड शैलीतील वास्तुकलेचे उत्कृष्ट (Dravidian style architecture) उदाहरण आहे. मंदिराच्या परिसरात असे काही स्तंभ (column) आहेत, ज्यांना वाजवल्यास संगीत वाद्यांसारखा (Musical Instruments) आवाज येतो. (Photo: Pexels) -
भव्य शिवलिंग
मंदिरातील शिवलिंग भारतातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी (Grand Shivalinga) एक आहे. या मंदिरात ११ व्या शतकातली नटराजाची मूर्तीही (Statue of Nataraja) आहे. मंदिराच्या भिंतींवर आणि स्तंभांवर खूप सुंदर नक्षीकाम आणि शिल्पे (Sculptures) आहेत. (Photo: Pexels) हेही पाहा- आख्ख्या जगात सर्वाधिक पाऊस भारतातल्या ‘या’ दोन जागी पडतो; कुठे आहेत ही ठिकाणं? जाणून घ्या…
कोणताही पाया नसताना तब्बल ८० टन वजनाच्या घुमटाचा भार; भूकंपासारख्या आपत्तीतही हजारो वर्षे टिकून आहे ‘हे’ महादेव मंदिर…
Mahadeo Temple In India: हे मंदिर हजारो वर्षात कित्येत भूकंप सहन करूनही त्याच सुंदरतेने उभा आहे. हे मंदिर केवळ धार्मिकच नाही तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा देखील आहे
Web Title: Brihadeeswara temple facts there is no foundation and an 80 ton dome on top of it know the history chol king rajaraj shravan month spl