• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. most connected railway station in india a train for every direction pdb

भारतातील ‘या’ एकमेव रेल्वे स्थानकावरुन चारही दिशांना धावतात गाड्या; तुम्हाला ठिकाण माहितीये का?

Railway Station in India: चारही दिशांना धावणाऱ्या गाड्यांचं केंद्र! भारताचं ‘हे’ अद्भुत स्टेशन कुठे आहे?

Updated: August 15, 2025 18:39 IST
Follow Us
  • भारतात रेल्वे ही सर्वांत मोठी आणि महत्त्वाची वाहतूक व्यवस्था आहे. लांबचा प्रवास करण्यासाठी सर्वांत सोईस्कर आणि परवडणारी वाहतूक व्यवस्था आहे.
    1/12

    भारतात रेल्वे ही सर्वांत मोठी आणि महत्त्वाची वाहतूक व्यवस्था आहे. लांबचा प्रवास करण्यासाठी सर्वांत सोईस्कर आणि परवडणारी वाहतूक व्यवस्था आहे.

  • 2/12

    पण अनेक वेळा आपल्याला ज्या गावी जायचं असतं, तिथे आपल्या जवळच्या स्थानकावरून थेट ट्रेन नसते. त्यामुळे प्रवासात दोन-तीन वेळा बदल करावे लागतात, वेळही जास्त लागतो व प्रवासही त्रासदायक होतो.

  • 3/12

    पण भारतात एक असे रेल्वेस्थानक आहे, जिथून तुम्हाला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाणारी ट्रेन सहजपणे मिळू शकते. हो, अगदी कोणत्याही दिशेला जाणारी. देशातलं एकमेव असं रेल्वेस्थानक कुठे आहे ते जाणून घ्या…

  • 4/12

    हे स्थानक उत्तर मध्य रेल्वे विभागात मोडते आणि देशातील प्रमुख रेल्वेमार्गांवर असलेले हे जंक्शन भारतभर प्रवास करणाऱ्यांसाठी एक केंद्रबिंदू ठरलं आहे.

  • 5/12

    दिवस-रात्र, २४ तास येथे गाड्यांची सतत ये-जा सुरूच असते. उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओडिशा, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये येथून थेट ट्रेन सेवा सुरू असते.

  • 6/12

    हे रहस्यमय रेल्वेस्थानक म्हणजे मथुरा जंक्शन. उत्तर प्रदेशातील पवित्र नगरी मथुरामध्ये असलेले हे स्थानक भारतातील एकमेव असे स्थानक आहे, जिथून देशाच्या चारही दिशांना थेट ट्रेन उपलब्ध असतात.

  • 7/12

    येथून उत्तर भारतातील जम्मू-काश्मीरपासून ते दक्षिणेतील कन्याकुमारीपर्यंत, पूर्वेतील आसामपासून ते पश्चिमेतील गुजरात आणि महाराष्ट्रापर्यंत थेट ट्रेन सेवा चालते.

  • 8/12

    विशेष म्हणजे दिल्लीतून दक्षिण भारतात जाणाऱ्या बहुतेक गाड्या मथुरा जंक्शनवरूनच जातात. त्यामुळे हे स्थानक एक महत्त्वपूर्ण जंक्शन बनले आहे.

  • 9/12

    दररोज जवळपास १९७ रेल्वेगाड्या येथे थांबतात, त्यामध्ये राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी, दुरंतो, सुपरफास्ट, एक्स्प्रेस, तसेच लोकल DEMU/MEMU गाड्यांचा समावेश आहे.

  • 10/12

    रेल्वे संचालनालयातर्फे १८७५ साली सुरू झालेल्या मथुरा जंक्शनमध्ये एकूण १० प्लॅटफॉर्म्स आहेत, जे देशातील प्रगत आणि सुविधा-संपन्न स्थानकांपैकी एक मानले जाते. येथून एकाच वेळी पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण या सगळ्या दिशांकडे जाणाऱ्या गाड्या सुटतात.

  • 11/12

    त्याशिवाय मथुरा ही भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी असल्यामुळे लाखो भाविक येथे दरवर्षी दर्शनासाठी येतात. त्यामुळेही येथील रेल्वेस्थानक कायमच वर्दळीने भरलेले असते.

  • 12/12

    मथुरा जंक्शनवरून दररोज शेकडो प्रवासी देशाच्या विविध भागांमध्ये थेट प्रवास करतात. त्यामुळे प्रवासादरम्यान ट्रेन बदलण्याच्या त्रासापासून वाचायचं असेल, तर मथुरा जंक्शनसारखं दुसरं ठिकाण नाही. (फोटो सौजन्य : indian express)

TOPICS
ज्ञानKnowledgeट्रेंडिंगTrendingभारतीय रेल्वेIndian Railwayरेल्वेRailway

Web Title: Most connected railway station in india a train for every direction pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.