-
विरोधीपक्ष इंडिया आघाडीने उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांची उमेदवार म्हणून निवड केली आहे. (Photo:X)
-
९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणुक पार पडणार आहे. ते एनडीएचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याविरुद्ध लढत आहेत. (Photo:X)
-
इंडिया अलायन्सचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी किती शिक्षित आहेत आणि त्यांची आतापर्यंतची कारकीर्द कशी आहे? (Photo:X)
-
बी. सुदर्शन रेड्डी यांचा जन्म ८ जुलै १९४६ रोजी आंध्र प्रदेशातील (आता तेलंगणा) मैलाराम येथील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हैदराबादमधून घेतले आणि उस्मानिया विद्यापीठातून बीए एलएलबी केले. (Photo:X)
-
एलएलबी पूर्ण केल्यानंतर, त्यांनी १९७१ मध्ये आंध्र प्रदेश बार कौन्सिलमध्ये वकिल म्हणून नोंदणी केली आणि तेव्हापासून ते कायद्याच्या क्षेत्रात जोडले गेले. सुरुवातीला ते वरिष्ठ वकील के. प्रताप रेड्डी यांच्या चेंबरमध्ये सामील झाले आणि त्यांनी हैदराबादच्या सिटी सिव्हिल कोर्ट तसेच आंध्र प्रदेशातील उच्च न्यायालयात विविध खटले हाताळले. (Photo:X)
-
८ ऑगस्ट १९८८ रोजी त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आणि ते महसूल विभागाचे प्रभारी होते. ते ८ जानेवारी १९९० पर्यंत या पदावर राहिले. त्यानंतर काही काळासाठी त्यांची केंद्र सरकारचे अतिरिक्त स्थायी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. (Photo:X)
-
ते ए.व्ही. एज्युकेशन सोसायटीच्या अनेक शैक्षणिक संस्थांचे सचिव आणि प्रतिनिधी देखील होते. १९९३-९४ या वर्षासाठी ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या वकिलांच्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्यानंतर, ८ जानेवारी १९९३ रोजी त्यांना उस्मानिया विद्यापीठाचे कायदेशीर सल्लागार आणि स्थायी वकील म्हणून नियुक्त करण्यात आले. (Photo:X)
-
२ मे १९९५ रोजी त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर २००५ मध्ये त्यांची गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. (Photo:X)
-
२००७ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि २०११ मध्ये ते या पदावरून निवृत्त झाले. (Photo:X) हेही पाहा- Asia Cup 2025: कर्णधार स्काय, उपकर्णधार गिल; बुमराहही संघाचा भाग! आशिया चषकासाठी भारतीय संघ सज्ज
इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचं शिक्षण किती? त्यांच्या कारकीर्दीबद्दल जाणून घ्या….
इंडिया आघाडीने उपराष्ट्रपतीपदासाठी बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे, ते किती शिक्षित आहेत आणि त्यांची आतापर्यंतची कारकीर्द कशी आहे ते जाणून घेऊयात…
Web Title: Vice president election 2025 india block candidate b sudarshan reddy education and career information in marathi spl