• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. vijay thalapathy rally stampede know about his political party and film career spl

Tamil Nadu stampede: राजकारणासाठी सिनेक्षेत्र सोडणारा विजय थलपती कोण आहे? त्याने कोणता पक्ष स्थापन केलाय?

Vijay Thalapathy Rally stampede : विजय थलपती एक अभिनेता म्हणून तुम्हाला माहित असेलच पण, त्याने राजकारणात कधी प्रवेश केला? या सभेचं आयोजन का करण्यात आलं होतं? याबद्दल जाणून घेऊयात…

Updated: September 28, 2025 12:15 IST
Follow Us
  • Vijay Thalapathy Rally stampede know about his political party and film career
    1/12

    Who is vijay thalapathy: दाक्षिणात्य अभिनेता सुपरस्टार विजय थलपतीने राजकारणात प्रवेश घेतल्यापासून तो प्रचंड चर्चेत आहे.

  • 2/12

    काल (२७ सप्टेंबर) रोजी तामिळनाडूमधील करूर याठिकाणी त्याच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या ठिकाणी भयानक चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली, ज्यामध्ये ३८ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर अनेकजण जखमीही झाले आहेत. यामध्ये महिला व बालकांचाही समावेश आहे.

  • 3/12

    विजय थलपती एक अभिनेता म्हणून तुम्हाला माहित असेलच पण, त्याने राजकारणात कधी प्रवेश केला? या सभेचं आयोजन का करण्यात आलं होतं? याबद्दल जाणून घेऊयात…

  • 4/12

    थलपती विजय
    थलपती विजय हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला तगडं फॅनफॉलोविंग असलेला सुपरस्टार आहे. तो अभिनेता तर आहेच पण अलिकडेच तो एक नेताही झाला आहे.

  • 5/12

    विजयची चित्रपट कारकिर्द १९९२ मध्ये सुरु झाली. त्याने बालकलाकार म्हणून सिनेविश्वात एन्ट्री घेतली होती. तेव्हापासून विजयने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. ज्या सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय.

  • 6/12

    गेल्याचवर्षी त्याने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि आता त्याच्या पक्षाच्या प्रचारसभेच्या रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ३८ लोकांचा मृत्यू झाला आहे.

  • 7/12

    पक्षाची स्थापना
    विजयने २ फेब्रुवारी २०२४ रोजी त्याच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ या पक्षाची स्थापना केली. याच पक्षातून त्याची राजकीय कारकीर्द सुरु झाली. चेन्नईत या पक्षाचे मुख्यालय आहे. विजयने अलिकडेच झालेल्या प्रचारसभेत जाहिर केलं होतं की तो कोणाबरोबरही युती करणार नाही. पुढील वर्षी होणाऱ्या तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकांसाठी विजयने आतापासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे व कालच्या त्याच्या रॅलीमध्ये हा दुर्देवी प्रकार घडला आहे.

  • 8/12

    मानधन व संपत्ती
    दक्षिणेत वियजच्या लोकप्रियतेचं वलय मोठं आहे. २०२४ मध्ये मिंटने दिलेल्या माहितीनुसार विजय ६०० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

  • 9/12

    गोट (द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम) या सिनेमातील भूमिकेसाठी त्याने तब्बल २०० कोटी मानधन घेतल्याचे बोलले जाते. त्यापूर्वी तो १००- १५० कोटी फी आकारत असे.

  • 10/12

    दरम्यान, पूर्णवेळ राजकारणात सक्रिय होण्याच्या उद्देशाने विजयने सिनेक्षेत्राला अलविदा केले आहे.

  • 11/12

    त्याचा ‘जन नायगन’ हा शेवटचा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मल्टिस्टारर असणार आहे.

  • 12/12

    सर्व फोटो साभार- थलपती विजय सोशल मीडिया

    हेही पाहा- ओ स्त्री…! लांबसडक वेणी, लाल साडी अन्…; ‘थामा’ ट्रेलर रिलीज इव्हेंटमधला श्रद्धा कपूरचा लूक चर्चेत…

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग न्यूजTrending Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Vijay thalapathy rally stampede know about his political party and film career spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.