-
दिवाळीचा उत्साह आणि सौंदर्याची तयारी दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद व सौंदर्याचा संगम. महिलांसाठी या सणाची तयारी पोशाख, दागिने आणि सुंदर मेंदीशिवाय अपूर्ण राहते.
-
लास्ट मिनीटसाठी परफेक्ट मेंदी डिझाइन्स कामाच्या व्यापामुळे वेळ कमी मिळणाऱ्या महिलांसाठी या वर्षी काही सोप्या आणि सुंदर लास्ट मिनीट मेंदी डिझाइन्स खास ट्रेंडमध्ये आहेत.
-
सिंपल पण एलिगंट डिझाइन्स लोकप्रिय जास्त वेळ न घेणाऱ्या सिंपल आणि क्लीन पॅटर्न्स — जसे की गोल बिंदी, बेली डिझाईन व फुलांची आकृती सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक पसंत केल्या जात आहेत.
-
फुलं आणि पानांच्या डिझाइन्स क्लासिक ट्रेंडमध्ये पारंपरिक फुलं, पानं व वेलींची आकृती या दिवाळीच्या डिझाइन्समध्ये सर्वाधिक मागणी असलेली आहे. या डिझाइन्स प्रत्येक हातावर आकर्षक लूक देतात.
-
आधुनिक टच असलेली मिनिमल मेंदी तरुण पिढीमध्ये मिनिमलिस्ट मेंदी डिझाइन्स जसे की फिंगर टिप्सवर हलके पॅटर्न किंवा अर्ध्या तळहातावर छोटे मोटिफ्स यांची क्रेझ दिसत आहे.
-
राखीव वेळेत करता येणाऱ्या सोप्या डिझाइन्स या डिझाइन्स विशेष म्हणजे घरीच कमी वेळात लावता येतात. प्रोफेशनल मेंदी आर्टिस्टची गरज न पडता, सुंदर परिणाम मिळवता येतो.
-
सणातील पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम या वर्षीच्या मेंदी डिझाइन्समध्ये पारंपरिक भारतीय मोटिफ्ससोबत आधुनिक ज्योमेट्रिक टच दिसत आहे — ज्यामुळे लूक अधिक आकर्षक बनतो.
-
दिवाळीला सजलेले हात म्हणजे शुभतेचं प्रतीक मेंदीचा गडद रंग शुभ मानला जातो. दिवाळीच्या रात्री सुंदर रचलेली मेंदी ही केवळ सजावट नसून आनंद, सौंदर्य व परंपरेचं ते प्रतीक आहे.
Diwali 2025 Mehndi Designs : दिवाळीच्या निमित्ताने ट्रेंडमधील खास मेंदी डिझाइन्स
दिवाळीच्या सणासाठी खास सोप्या आणि आकर्षक मेंदी डिझाइन्स; शेवटच्या मिनिटालाही हात सजवण्यासाठी परफेक्ट पर्याय
Web Title: Diwali 2025 mehndi designs simple elegant traditional and last minute easy mehndi designs svk 05