-

Banoffee Pie Cake (युनायटेड किंग्डम) केळे, टॉफी व व्हिप्ड क्रीम यांचा सुंदर संगम असलेला हा बॅनोफी पाई केक ब्रिटनची खासियत आहे. ओलसर आणि मऊसर टेक्श्चर असलेला हा डेझर्ट प्रत्येक थरासोबत समृद्ध चवीचा अनुभव देतो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
Basbousa (मिडल ईस्ट) सेमोलिनापासून तयार होणारा हा मधुर केक सुगंधी साखरेच्या पाकात भिजवला जातो. वरून खोबरे किंवा बदामाची सजावट करून दिला जाणारा हा बासबुसा मध्यपूर्वेतील सण-समारंभांचा अविभाज्य भाग आहे. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
Bolo de Fubá (ब्राझील) कॉर्नमिलपासून तयार होणारा हा पारंपरिक ब्राझिलियन केक हलका, मऊ व हलक्या गोडीचा असतो. खोबरे किंवा चीजच्या चवीमुळे या केकला उष्ण कटिबंधीय गोडपणाची खास झाक मिळते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
Castella (जपान) पोर्तुगीज व्यापाऱ्यांकडून जपानमध्ये आलेला हा कॅस्टेला केक अत्यंत मऊ आणि हलक्या गोडीचा असतो. त्याचा नाजूक स्पंजसारखा पोत आणि साधेपणातली रुचकरता त्याला खास बनवते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
Lamington (ऑस्ट्रेलिया) चॉकलेटमध्ये बुडवून नारळाच्या चुर्यात घोळवलेले लहान स्पंज केक म्हणजे लॅमिंग्टन. हा nostalgic आणि हलका डेझर्ट चहा किंवा कॉफीसोबत आनंदाने खाल्ला जातो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
Medovik (रशिया) ‘हनी केक’ म्हणून ओळखला जाणारा हा मेडोविक रशियन क्लासिक आहे. मधाच्या थरांनी तयार केलेला स्पंज आणि खमंग सॉर क्रीम फ्रॉस्टिंग यांची सांगड त्याला गोड आणि थोडासा तिखट-आंबट स्वाद देते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
Sachertorte (ऑस्ट्रिया) गडद चॉकलेट आणि अॅप्रिकॉट जॅमच्या थरांनी सजवलेला हा सॅचरटॉर्ट केक म्हणजे एक परिपूर्ण युरोपियन आनंद. वरचा चॉकलेट गनाश त्याला एलिगंट व थोडासा कडवट, पण आकर्षक गोडवा देतो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
Sans Rival (फिलिपिन्स) ‘विना स्पर्धा’ असा अर्थ असलेला सॅन्स रिव्हल हा खमंग आणि कुरकुरीत केक फिलिपिन्सचा अभिमान आहे. काजू मेरिंग आणि बटर क्रीमचे थर त्याला एक वेगळाच टेक्श्चर आणि अप्रतिम चव देतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
केकप्रेमींसाठी खास! जाणून घेऊया केकचे लोकप्रिय असलेले ‘हे’ आठ प्रकार…
गोड पदार्थांची चाहूल लागली की, जगभरातील वेगवेगळ्या देशांतील खास केकची आठवण होते. चला, जाणून घेऊया वेगवेगळ्या आठ देशांचे केकचे खास प्रकार.
Web Title: Sweet traditional famous cake desserts rich flavours soft texture classic recipes svk 05