-

अनेक सेलिब्रिटी दिवसाची सुरुवात लेमन वॉटर, जिरा पाणी किंवा गाईच्या तुपाच्या शॉटने करताना दिसतात. पचन सुधारण्यापासून ते त्वचेच्या आरोग्यापर्यंत अनेक फायदे मिळतात, असे ते सांगतात.
-
अमृता फडणवीसचे सकाळचे वेगळे ड्रिंक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र सकाळचा वेगळाच पेय पर्याय निवडला असून त्या दररोज हळद आणि काळीमिरी पाण्याचे सेवन करतात.
-
मुलाखतीत खुलासा करली टेल्सच्या इन्स्टाग्रामवरील १२ नोव्हेंबरला पोस्ट झालेल्या व्हिडीओमध्ये त्यांना सकाळच्या रुटीनबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की, त्या दिवसाची सुरुवात ‘हळद आणि मिरी पाणी’ घेऊन करतात.
-
हळद–मिरीचे संयोजन आरोग्यासाठी फायदेशीर अमृता फडणवीस या संयोजनाचे जे फायदे सांगतात, त्याला तज्ज्ञांचीही साथ आहे. आरोग्यविषयक वेबसाइटनुसार हळद आणि काळी मिरी एकत्र घेतल्याने दोन्ही घटकांचे गुणधर्म अधिक प्रभावी होतात.
-
हळदीतील कुरक्यूमिन आणि मिरीतील पायपरीन २०१८ च्या अहवालानुसार हळद आणि काळी मिरीमध्ये विशेष घटक असतात. हळदीतील करक्यूमिन आणि मिरीतील पायपरीन हे दोन्ही शरीरासाठी उपयुक्त मानले जातात.
-
पचन व रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर या संयोजनाचे सेवन पचनशक्ती वाढवणे, वेदना कमी करणे आणि शरीरातील अँटीऑक्सिडंट्स वाढवणे यासाठी उपयुक्त ठरू शकते, अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे.
-
दाह कमी करण्यास मदत करक्यूमिनचे दाहविरोधी (anti-inflammatory) गुण आणि पायपरीनचे सांधेविकार व वेदना कमी करणारे गुण एकत्र आल्यावर त्यांचा परिणाम अधिक चांगला दिसतो, असे अभ्यासात नमूद आहे.
-
परस्परांच्या गुणधर्मांना चालना अहवालानुसार मिरीतील पायपरीन हे करक्यूमिनचे शोषण वाढवते, त्यामुळे हळदीतील गुणधर्म शरीरात अधिक चांगल्या प्रकारे काम करतात.
-
आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला आवश्यक ही माहिती फक्त जनजागृतीसाठी असून वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही. कोणताही नवीन आरोग्य उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
अमृता फडणवीस दिवसाची सुरुवात करतात ‘या’ पाण्याने; जाणून घ्या या पेयाचे आरोग्यदायी फायदे
Find out why Amruta Fadnavis chooses this drink: हळद आणि मिरी एकत्र घेतल्याने दाह कमी होणे, पचन सुधारणा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
Web Title: Cm devendra fadnavis wife amruta turmeric pepper morning drink benefits health tips svk 05