-

अमृता फडणवीस यांचे हेल्थ सिक्रेट्स; शेवग्याचे सूप, ओट्स डेझर्ट आणि खास काढ्याची चर्चा
-
अमृता फडणवीस यांनी करली टेल्सच्या मुलाखतीत शेवग्याच्या सूपची रेसिपी, ओट्स डेझर्ट आणि गाण्याआधी घेणारा काढा याची खास माहिती दिली
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी टेल्सच्या मुलाखतीत आपल्या हेल्दी रुटिन आणि घरच्या रेसिपींची खास माहिती दिली.
-
त्यांनी सांगितले की, त्या नियमितपणे शेवग्याचे सूप पितात आणि ते त्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते.
-
शेवगा उकळवून व नंतर गाळून त्याचा बेस तयार करतात आणि मग त्यात काळी मिरी व लसूण घालून सूप चविष्ट बनवतात.
-
शेवग्याच्या पानांमध्ये आयर्न, व्हिटॅमिन C, फायबर भरपूर असल्याने हे सूप रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि ऊर्जा देते.
-
त्यांनी पुढे सांगितले की, त्या हेल्दी ओट्स डेझर्टदेखील बनवतात, ज्यासाठी त्या ओट्स, बदामाचे दूध आणि ब्लूबेरी वापरतात. हा डेझर्ट हलका, पोटभर आणि पूर्णपणे guilt-free असल्याने त्यांच्या डायटमध्ये तो महत्त्वाचा आहे.
-
मुलाखतीत त्यांनी आणखी एक खास काढा सांगितला. पाण्यात दालचिनी, लवंग, इलायची, आलं घालून तो १० ते १५ मिनिटं उकळवतात. अमृता म्हणाल्या की, गाण्याच्या रेकॉर्डिंगपूर्वी त्या हा काढा नक्की पितात, कारण तो घसा स्वच्छ, आवाज स्थिर आणि शरीर हलकं ठेवतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता फडणवीस/इन्स्टाग्राम)
अमृता फडणवीस यांच्या हेल्थ रुटिनची चर्चा; शेवग्याचे सूप आणि गाण्यांच्या आधी घेतला जाणारा ‘या’ काढ्याची सांगितली रेसिपी
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी टेल्सच्या मुलाखतीत शेवग्याच्या सूपची रेसिपी, त्याचे फायदे आणि गाण्याआधी घेणाऱ्या काढ्याची माहिती दिली
Web Title: Cm devendra fadnavis wife amruta fadnavis healthy lifestyle kadha moringa soup shared recipes svk 05