Haryana Congress : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षला पराभव पत्करावा लागला आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून दोन महिने उलटले आहेत तरीही अद्याप काँग्रस पक्षामधील गोंधळाची स्थिती कमी झाली नाही. काँग्रेसचा विधिमंडळ पक्षाच्या नावाची घोषणा अद्याप होऊ शकलेली नाही. यासाठी काँग्रेस पक्षात माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा आणि सिरसाच्या खासदार कुमारी सेलजा यांच्या नेतृत्वातील दोन गटांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच कारणीभूत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१८ डिसेंबर रोजी हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटी (HPCC)चे अध्यक्ष उदय भान यांनी राज्यातील सर्व २२ जिल्ह्यांसाठी पक्षाच्या प्रभारींची यादी जाहीर केली. भान हे हुड्डा यांच्या जवळचे मानले जातात, तसेच ते मागच्या वेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. मात्र विद्यमान आणि माजी आमदार यांच्यासह ज्यांची भान यांनी जिल्हा पक्ष प्रभारी म्हणून नेमणूक केली आहे, ते हुड्डा यांच्या गटाशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे .

यानंतर १९ डिसेंबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) हरियाणाचे प्रभारी सरचिटणीस दीपक बाबरिया यांनी भान यांच्या यादीला स्थगिती दिली. विशेष म्हणजे बाबरिया यांनी आदेश सार्वजनिक करण्याची मागणी लावून धरल्यानंतर तो मंगळवारी संध्याकाळी सार्वजनिक करण्यात आला. द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत दीपक बाबरिया यांनी यादी रोखण्याच्या निर्णयाबद्दल तसेच हरियाणा काँग्रेसशी संबंधित इतर मुद्द्यांवर सविस्तर माहिती दिली.

भान यांची काँग्रेस जिल्हा प्रमुखांची यादी का रोखून धरली?

हे बरोबर आहे की मी यादी रोखून धरली. यादी तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही त्रुटी होत्या त्यामुळे मी पुढील आदेश येईपर्यंत ती रोखण्याचे आदेश जारी केले.

यादीमध्ये एकाच गटाचे वर्चस्व दिसून येत असल्याने तुम्ही हा निर्णय घेतला का?

मी याबद्दल कुठलेही वक्तव्य करणार नाही, पण मला वाटते की यादी जाहीर करण्यापूर्वी राज्यातील ठराविक काँग्रेस नेतृत्वाबरोबर चर्चा करण्यात आली नव्हती. राज्य नेतृत्वाच्या सूचना किंवा चर्चा केली जाईल त्यानंतर नवीन यादी जाहीर केली जाईल. संपूर्ण राज्य काँग्रेस नेतृत्वाचे मत यामध्ये घेतले जाईल आणि अशा नियुक्त्या करण्यापूर्वी त्यांच्या सूचना मागवल्या पाहिजेत आणि त्यांचा समावेश केला पाहिजे.

भान यांनी जिल्हा प्रभारी म्हणून कोणाची नियुक्ती केली?

विद्यमान काँग्रेस आमदारांमध्ये आफताब अहमद, शिशपाल केहरवाला, निर्मल सिंग, नरेश सेलवाल, रघुबीर सिंग तेवतिया आणि अशोक अरोरा यांची जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माजी आमदारांमध्ये बिशन लाल सैनी, राव दान सिंह, सुभाष गोयल, अमित सिहाग, करणसिंग दलाल, चिरंजीव राव, आनंदसिंग दांगी, सुभाष देसवाल, लेहरी सिंग, मेवा सिंग, भीम सेन मेहता, निरज शर्मा, जयवीरसिंग वाल्मिकी, डॉ. संत कुमार यांचा समावेश होता. उदय भान यांनी जाहीर केलेल्या २२ जिल्हा प्रभारींच्या यादीत ठाकूर राजा राम, लखन सिंगला आणि बजरंग दास गर्ग यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांचाही समावेश होता.

हेही वाचा>> कोण आहे पाकिस्तानातून भारतात हल्ले घडवणारा रणजीत सिंह नीता? ट्रक ड्रायव्हरने कशी केली खलिस्तान झिंदाबाद फोर्सची स्थापना?

काँग्रेस पक्षांतर्गत गटबाजीशी झुंजत असताना सत्ताधारी भाजपा मात्र आपला केडर बळकट करत आहे, तुम्ही याकडे कसे पाहता?

भाजपा अशा गोष्टी करून (सदस्यत्व मोहीम आणि निवडणुका आयोजित करून) लोकांची दिशाभूल करत आहे. आपण अनधिकृतपणे सरकारमध्ये बसलो आहोत हे त्यांना माहीत आहे. लोक विरोधात असताना वेगवेगळ्या प्रकराच्या युक्त्या वापरून सत्ता स्थापन केले आहे. तरीही ते जिंकून येत सत्तास्थापन करण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांचा खोटारडेपणा लवकरच उघड होईल आणि लोक त्यांना सत्तेतून बाहेर फेकतील.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल (राज्यसभेत) केलेल्या टीकेमुळे काय होत आहे ते तुम्ही पाहा . त्यांच्या या वक्तव्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. हीच भावना हरियाणामध्येही निर्माण होत आहे, भाजपा सत्तेत कसा आला यावर लोकांचा विश्वास बसत नाही. आम्ही कायदेशीर मार्ग देखील स्वीकारला आहे आणि निवडणूकीसंबंधी याचिका दाखल केल्या आहेत.

हरियाणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला टक्कर देण्यासाठी तुमची योजना काय?

आगामी महापालिका निवडणुकीची तयारी आम्ही करत आहोत. महापालिका स्तरावर समित्या स्थापन करण्यात येत आहेत आणि लवकरच कामाला गती येईल. राज्य नेतृत्वाशी चर्चा करून निर्णय घेणे आवश्यक आहे जे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केले जाईल. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची की नाही आणि उमेदवार निवडीचा निर्णय हा राज्य नेतृत्वाशी चर्चा करून घेतला जाईल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haryana congress deepak babaria stopped pcc chief list bhupinder singh hooda mp kumari selja factions rak