आंध्रप्रदेशातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अखेर भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाने रविवारी आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील आत्मकुर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मोठा विजय मिळवला. वायएसआर काँग्रेसचे उमेदवार विक्रम रेड्डी यांनी भाजपा उमेदवाराचा तब्बल ८२,८८८ मतांनी पराभव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

४९ वर्षीय गौतम रेड्डी हे या मतदारसंघाचे राज्याचे उद्योगमंत्री होते. त्यांचे २१ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर या मतदार संघात पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. भाजपा आणि वायएसआर काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. आत्मकुर हा मतदार संघ वायएसआर काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ आहे. रेड्डी बंधूंचे वडील राजमोहन रेड्डी हे चार वेळा नेल्लोरमधून चार वेळा खासदार होते. त्यानंतर गौतम रेड्डी हे नेल्लोरमधील आत्मकुर या विधानसभा मतदार संघातून आमदार होते. तर भाजपा वायएसआर कॉंग्रेसचा हा पारंपरिक मतदार संघ खेचून आणण्यासाठी संपूर्ण ताकतीने निवडणुकीत उतरला होता. मात्र त्यांना यश आले नाही. विक्रम रेड्डी हे त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या केएमसी कंस्ट्रक्शन लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. कंपनी पायाभूत सुविधा, उत्पादन आणि बांधकामाच्या व्यवसायात आहे. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या १३ अन्य कंपन्यांशीही विक्रम संबंधित आहे.

२०१४ च्या निवडणुकीपूर्वी राजमोहन रेड्डी यांनी त्यांचे चिरंजीव गौतम यांना राजकारणात उतरवले. गौतम हे राजकारणात सक्रिय झाले तेव्हा विक्रमने यांनी पूर्णपणे कुटुंबाचा व्यवसाय सांभाळला. विक्रम हे आयआयटी-चेन्नईचे पदवीधर असून त्यांनी अमेरिकेतून बांधकाम व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. असे म्हटले जाते की विक्रम सुरुवातीला निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते. त्याऐवजी आपल्या मेहुण्याने निवडणूक लढवावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र अखेर अनेक प्रयत्नांनंतर विक्रम यांनी भावाच्या जागी निवडणूक लढवण्यास होकार दिला.

वायएसआर काँग्रेसचे जिल्ह्याचे प्रभारी बालिनेनी श्रीनिवास रेड्डी यांनी विक्रम रेड्डी यांचे वर्णन मृदूभाषी व्यक्ती म्हणून केले आहे. “ ते अत्यंत विनम्र आणि सौम्य असून आणि त्यांचे पाय कायम जमिनीवर असतात. जरी ते राजकीय घराण्यातील असले तरी सक्रिय राजकारणातील त्यांचा हा पहिलाच अनुभव आहे. आत्तापर्यंत ते एक अत्यंत यशस्वी उद्योजक अशीच त्यांची ओळख होती” असे त्यांनी सांगितले.

त्रेर म्हणाले की, ” राजकारण त्यांच्यासाठी नवीन आहे. माझे वडील आणि भाऊ राजकारणात होते पण हे माझ्यासाठी खूपच नवीन क्षेत्र आहे. आता निवडून आलेला प्रतिनिधी म्हणून मी ही नवीन भूमिका योग्यरीत्या पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या भावाने आत्मकूर मतदारसंघाचे अतिशय काळजीपूर्वक नेतृत्व केले होते आणि आता मी त्यांचे काम पुढे चालू ठेवेन”. विक्रम रेड्डी यांनी त्यांचा पारंपरिक मतदरसंघ जिंकला. भाजपाला पराभवाची धूळही चारली. विक्रम हे एक यशस्वी उद्योगपती आहेत. त्यांच्या वडिलांनी सुरू केलेल्या व्यवसायाला त्यांनी एक वेगळया उंचीवर नेऊन ठेवले आहे. मात्र असे असूनसुध्दा पक्ष त्यांना त्यांच्या भावाकडे असलेले उदयोग खाते मंत्री म्हणून सोपावणार की नाही याबाबत कुठलीही स्पष्टता नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In andhra pradesh assembly bypolls ysrcp got success to retain there traditional constituency pkd
First published on: 27-06-2022 at 11:37 IST