जळगाव – चोपडा मतदारसंघात शिवसेनेने (ठाकरे गट) राजू तडवी यांना दोन दिवसांपूर्वीच उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध केल्याने, तडवींची उमेदवारी ऐनवेळी रद्द करून भाजपमधून आयात केलेले प्रभाकर सोनवणे यांना आता उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाकरे गटाने चोपडा मतदारसंघासाठी मुंबईत शिक्षणाधिकारी असलेले राजू तडवी यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर स्थानिक तालुकाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन पदांचे राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठविले होते. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन ठाकरे गटाला दोनच दिवसांत राजू तडवी यांना दिलेला एबी अर्ज परत घ्यावा लागला. तडवी यांच्याऐवजी भाजपमधून आलेले प्रभाकर सोनवणे यांना आता चोपड्याची उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार चंद्रकांत सोनवणे आणि ठाकरे गटाचे प्रभाकर सोनवणे यांच्यात आता लढत होणार आहे.

हेही वाचा – उमेदवार सीमोल्लंघनाचा भाजपचा प्रयोग

हेही वाचा – Kalyan Rural Vidhan Sabha Constituency : मनसेचे राजू पाटील यांना शिंदे यांच्याकडून मदतीची परतफेड नाहीच

प्रभाकर सोनवणे हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार होते. शिवसेनेच्या लता सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यावेळी प्रभाकर सोनवणे यांच्यावर ते भाजपचे छुपे उमेदवार असल्याचा आरोप झाला होता.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackeray group changed its candidate in chopda within two days ab form taken back from raju tadvi print politics news ssb