भारत जोडो यात्रेतून काय मिळालं? तुमच्यात काय बदल झाला? राहुल गांधी म्हणाले "मी बऱ्याच वर्षांपूर्वी..." | What did you get from Bharat Jodo Yatra What has changed in you Rahul Gandhi said Many years ago I msr 87 | Loksatta

X

भारत जोडो यात्रेतून काय मिळालं? तुमच्यात काय बदल झाला? राहुल गांधी म्हणाले “मी बऱ्याच वर्षांपूर्वी…”

“माझी प्रतिमा डागाळण्यासाठी भाजपाने कोट्यवधी खर्च केले”, असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.

भारत जोडो यात्रेतून काय मिळालं? तुमच्यात काय बदल झाला? राहुल गांधी म्हणाले “मी बऱ्याच वर्षांपूर्वी…”
(फोटो-पीटीआय)

आता राहुल गांधी बदलले आहेत का?, भारत जोडो यात्रेने त्यांची प्रतिमा बदलण्यास मदत केली आहे? जेव्हा काँग्रेस पूर्णपणे अपेक्षा बाळगून आहे की, त्यांच्या भारत जोडो यात्रा राहुल गांधींबाबत लोकांची असेलली धारणा बदलेल आणि पक्षाच्या पुनरुत्थानात योगदान देईल, तेव्हा राहुल गांधींचं एक विधान समोर आल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आल्याचं दिसत आहे. सोमवारी एक पत्रकारपरिषदेत जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, भारत जोडो यात्रेतून काय शिकायला मिळालं? तुमच्यात काय बदल झाला? या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी म्हटले की, “मी बऱ्याच वर्षांपूर्वीच राहुल गांधींना सोडलं आहे, राहुल गांधी तुमच्या डोक्यात आहेत, माझ्या डोक्यात नाहीत. समजण्याचा प्रयत्न करा, हेच आपल्या देशाचं तत्वज्ञान आहे.”

त्यांच्या या वक्तव्याचा विविध नेत्यांकडून वेगवेगळा अर्थ लावला जात आहे, काहींना यामध्ये तात्विक अंतर्भाव दिसला, तर काहींनी तो बदललेला माणूस वाटला. काँग्रेसच्या काही नेत्यांचा हवाला देत इंडियन एक्स्प्रेसच्या एका वृत्तात राहुल गांधींच्या वरील विधानाचे स्पष्टीकरण देण्यााचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, “ ते आता अधीर राहिलेले नाहीत. ते आता रागावलेले नाही. राहुल गांधींही या अगोदर लवकर राग येण्याबाबत बोलेले आहेत, त्यांनी म्हटले होते की, एक-दोन तासांत माझी चिडचिड व्हायची, आता आठ उलटूनही माझी चिडचिड होत नाही, कोणी मला मागून धक्का दिला किंवा ओढलं तरी त्याने काहीच फरक पडत नाही. मला कोणी मागून ढकलले किंवा ओढले तरी फरक पडत नाही.”

माझी प्रतिमा डागाळण्यासाठी भापाने कोट्यवधी खर्च केले –

भाजपाकडून होणाऱ्या टीकेबाबत राहुल गांधींनी सांगितले की, “भाजपाने माझी प्रतिमा डागाळण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत आणि त्यांनी माझी एक प्रतिमा बनवली आहे. लोकांना वाटतं की हे माझ्यासाठी हानीकारक आहे परंतु प्रत्यक्षात हे माझ्यासाठी फायदेशीर आहे. कारण सत्य माझ्यासबोत आहे आणि सत्य लपवलं जाऊ शकत नाही. त्यांनी माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी जेवढा पैसा खर्च केला, तेवढीच ताकद मला देत आहेत.”

याशिवाय “राहुल गांधी म्हणाले, जिथपर्यंत माझ्याविरोधात वैयक्तिक टीकेचा प्रश्न आहे, तर जेव्हा एखादी व्यक्ती राजकीय पद स्वीकारते तेव्हा ते होतात. जर तुम्ही मोठ्या शक्तीच्या विरोधात लढत असाल तर तुमच्यावर वैयक्तिक टीका होतील. मात्र जर तुम्ही एखाद्या शक्तीच्याविरोधात लढत नाहीत आणि केवळ इकडे-तिकडे तरंगत आहात तर तुमच्यावर वैयक्तिक टीका होणार नाही. त्यामुळे जेव्हा माझ्यावर वैयक्तिक टीका होते, मला समजत असतं की मी योग्य मार्गाने पुढे जात आहे. एकप्रकारे या वैयक्तिक टीका, माझी प्रतिमा खराब करण्यासाठी भाजपा जे पैसे खर्च करत आहे… ते सर्व माझे गुरू आहेत जे मला सांगतात की मला एका निश्चित दिशेने जाण्याची आवश्यकता आहे, कोण्या अन्य दिशेने नाही.”

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 18:19 IST
Next Story
पसमांदा मुस्लिमांना उमेदवारी देण्यामागील भाजपाची नीती काय?