लोणावळा : पर्यटकांचं आकर्षण केंद्र असलेल्या लोणावळ्यात गेल्या २४ तासात १३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याआधी १२ जून ला यावर्षीचा सर्वाधिक पाऊस कोसळला होता. परंतु, गेल्या २४ तासात पावसाने जोरदार बॅटिंग करत जून महिन्यातील रेकॉर्ड तोडत १३६ मिलिमीटर पावसाची कोसळला आहे. महाराष्ट्रातील लोणावळा हे पर्यटकांसाठी पर्वणी ठरलेलं शहर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील वाद आता चिघळला; एकाची हत्या, भाजपचा ‘हा’ पदाधिकारी ताब्यात

पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यामध्ये गेल्या २४ तासात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यामध्ये सतत पाऊस कोसळत आहे. यावर्षी आत्तापर्यंत ७९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. लोणावळ्यात दररोज पावसाची बॅटिंग सुरू असल्याने नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्याचबरोबर सर्वांचं आकर्षण केंद्र असलेलं भुशी धरण देखील ओव्हर फ्लो झालेल आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा जणू हिरवा शालू नेसला आहे असा भास होतो आहे. डोंगरदर्‍यातून धबधबे वाहू लागले आहेत. वीकेंड आला की लोणावळ्यात हमखास गर्दी होते. वाहतूक पोलिसांची दमछाक होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 136 mm of rain fell in last 24 hours in lonavala kjp 91 mrj