पुणे: तू दिसायला सुंदर आहेस. तुला चित्रपटामध्ये काम मिळवून देतो असे सांगून पुण्यातील हडपसर भागात राहणार्या १५ वर्षीय मुलीवर डान्स टीचरने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
सुशील राजेंद्र कदम वय ३२, रा. सर्व्हे नंबर १०३ गोपालपट्टी चौक मांजरी बुद्रुक असे आरोपीचे नाव असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील सहा महिन्यापासून आरोपी सुशील कदम यांच्याकडे पीडित मुलगी डान्स शिकण्यास जात होती. तू दिसायला सुंदर असून तुला चित्रपटामध्ये काम मिळवून देतो असे आरोपी सुशील कदम याने पीडित मुलीस सांगितले. ही बाब पीडित मुलीने घरी सांगितली. त्यावर आरोपी सुशील याने आजवर अनेक वेळा फर्स्ट लुक करिता घेऊन गेला. त्या प्रत्येक वेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत तू जर कोणाला काही सांगितले. तर तुझ्या आई वडिलांना जीवे ठार मारेल अशी धमकी दिली होती. त्यामुळे पीडित मुलीने हा प्रकार घरी सांगितला नाही.
आणखी वाचा-पुणेकर ‘खड्डयात’… खड्डे बुजविण्याचे काम ठप्प
काल देखील फर्स्ट लुक करीता पीडित मुलीला आरोपी सुशील कदम घेऊन गेला. पण पीडित मुलीच्या आईला संशय आल्याने आरोपी सुशील कदम यास फोन केला. तुम्ही कुठे आहात आता भेटायचे आहे. त्यावर आरोपी सुशील कदम याने उडवाउडवीची उत्तर दिली. आम्ही सासवड येथील लॉजवर असल्याचे सांगितले. त्यानंतर पीडित मुलीचे घरचे सर्वजण घटनास्थळी गेले. त्यावेळी पीडित मुलीने तिच्यावर होणार्या अत्याचारा बाबत सांगितले. या घटनेनंतर आरोपी सुशील कदम विरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.