पुणे शहरातील भवानी पेठ येथील टिंबर मार्केट मधील लाकूड साहित्याच्या सात आठ गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.तर या आगीवर नियंत्रण मिळविण्याच काम सुरू आहे.अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,टिंबर मार्केट येथील रामोशी गेट जवळ असलेल्या लाकूड सामान असलेल्या सात आठ गोडाऊनला पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली.या आगीमध्ये गोडाऊन मधील लाकडाचे सर्व साहित्य जळून खाक झाले असून अद्याप ही आग सुरूच आहे.त्या आगीवर नियंत्रण मिळविण्याच काम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रू आहे.यासाठी पुणे शहर,पुणे कॅन्टोमेंट पीएमआरडीए च्या अशा एकूण अग्निशमन दलाच्या १८गाड्या घटनास्थळी दाखल आहेत.तर ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप पर्यंत समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A massive fire broke out at a timber godown in pune timber market svk 88 amy