पुणे : ओळखीतून प्रेम झाल्यानंतर पुण्यातील एका तरुणीच्या विवाहात कुटुंबीयांनी लाखो रुपये खर्च केले. विवाहानंतर अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या तरुणीवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. अमेरिकन पोलिसांनी तिची सुटका केली. पुण्यात आल्यानंतर तिने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर धर्मांतरासाठी दबाब आणि शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात तरुणीच्या पतीसह सासरकडील नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणी पती लव अरुण वर्मा, दीर कुश अरुण वर्मा, परवीन अरुण वर्मा, विधू वर्मा, डॅनियल वर्मा आणि अरुण वर्मा (सर्व रा. खारघर, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नवी मुंबईतील खारघर, तसेच अमेरिकेत एक डिसेबर २०२२ पासून घडला आहे. डेक्कन पोलिसांनी संंबंधित गुन्हा तपासासाठी नवी मुंबईतील खारघर पोलिसांकडे सोपविला आहे. तक्रारदार तरुणी पुण्यातील विधी महाविद्यालय रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहे. लव शर्मा आणि तरुणी एकाच कंपनीत नोकरी करत होती. तेथे त्यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला. मुलीच्या हट्टामुळे तिच्या आई-वडिलांनी लाखो रुपये खर्च करून विवाह करून दिला. त्या वेळी लव आणि त्याच्या नातेवाईकांनी अवास्तव मागण्या केल्या. त्यांनी ५० हजार डाॅलर हुंडा दिला. त्यानंतर त्यांच्या मागण्या वाढत राहिल्या. तरुणीला धर्मांतर करण्यासाठी दबाब येऊ लागला होता. दीर कुश याने तरुणीची बदनामी केली. दरम्यान, तिचा पती लव अमेरिकेत नोकरीसाठी गेला. त्याने तिला अमेरिकेत बोलावून घेतले. लवने शारीरिक आणि मानसिक छळ केला, असे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा – पुण्यातील दोन बँकांवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध

हेही वाचा – पुणे : विद्यापीठात ड्रोन तंत्रज्ञानावरील अभ्यासक्रम

अमेरिकेतील पोलिसांकडे तिने मदत मागितली. अमेरिकन पोलिसांनी तिची सुटका करून भारतीय दूतावासाकडे सुपूर्द केले. तरुणीच्या वडिलांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर ते अमेरिकेत गेले आणि तिला घेऊन पुण्यात आले. तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक मीरा कवटीवार तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A pune girl who was pressured to convert after a love marriage was rescued by the american police pune print news rbk 25 ssb