पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुका संस्थेशेजारील प्रवेशद्वाराने आता केवळ फेस रिडींगच्या माध्यमातूनच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नोंदणी करण्यासाठी १० एप्रिलची मुदत देण्यात आली असून, नोंदणीविना प्रवेश दिला जाणार नसल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पुणे : स्वस्तात शेतजमीन देण्याच्या आमिषाने सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांची ६६ लाखांची फसवणूक

हेही वाचा – “…म्हणून भाजपात प्रवेश केला”, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला हर्षवर्धन पाटलांचं प्रत्युत्तर

आयुका संस्थेशेजारील प्रवेशद्वारावर बायोमेट्रिक प्रवेशासाठीच्या अडचणी विचारात घेऊन नवीन बायोमेट्रिक आणि फेस रिडिंग प्रणाली बसवण्यात आली आहे. या पुढे या प्रवेशद्वारावरून बायोमेट्रिक आणि फेस रिडिंग करूनच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे १० एप्रिलपर्यंत कुलसचिव कार्यालयासमोरील प्रतीक्षा कक्षात सुरक्षा विभागाकडून कर्मचाऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे. विद्यापीठातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी, विद्यापीठ आवारात राहणारे रहिवासी आणि विद्यार्थी, विद्यार्थिनींनी नोंदणी करावी. नोंदणी नसल्यास या प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाणार नाही, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Access to ayuka entrance of pune university is now only through face reading pune print news ccp 14 ssb