पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला. अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर पार्थ पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळात वर्णी लागणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्याचदरम्यान पुणे स्टेशन येथील पुणे जिल्हा बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयास अजित पवार यांनी भेट दिली. अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्यासह अन्य संचालकासोबत होणार्‍या बैठकीत नेमकी काय चर्चा होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – पेटीएम पेमेंट्स बँकेला ५.३९ कोटींचा दंड; पुण्यातील अण्णासाहेब मगर बँकेवरही कारवाई

हेही वाचा – अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार नेमकं मावळ की शिरूर लोकसभेतून लढणार?

अजित पवार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केल्यानंतर पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे म्हणाले होते की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्हा सहकारी बँकेत ३२ वर्षांपासून काम करत होते. या दरम्यान आशिया खंडातील उत्कृष्ट बँक म्हणून नावारूपास आली. पण उपमुख्यमंत्रीपद आणि पक्षाचा कारभार वाढला आहे. त्यामुळे पक्ष संघटनेसाठी वेळ आणि उपमुख्यमंत्रीपदाला न्याय देण्यासाठी अजित पवारांनी सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. मात्र अजित पवार दर महिन्याला बँकेचा आढावा घेणार असल्याचे सांगितले होते.