राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२३पासूनच करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षार्थींनी अलका टॉकीज चौकात आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या निर्णयाला आंदोलक स्पर्धा परीक्षार्थींनी समर्थन देत घोषणाबाजीही केली.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षेत बदल करण्याचे जाहीर केले आहे. तसेच हे बदल २०२३ पासून लागू होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. मात्र २०२३ ऐवजी २०२५पासून हे बदल लागू करण्याची राज्यभरातील उमेदवारांची मागणी आहे. या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी काँग्रेसतर्फे दोनवेळा आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षार्थींनी मंगळवारी पुण्यात आंदोलन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>अश्विनी जगताप, शंकर जगताप समर्थकांकडून इमेज वॉर!; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

आमदार गोपीचंद पडळकर, अभिमन्यू पवार, सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. तसेच आंदोलनस्थळावरूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता फडणवीस यांनी राज्यसेवेतील बदल २०२५पासून लागू करण्याच्या अनुषंगाने सकारात्मक भूमिका घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससीला पत्र लिहून २०२५पासून बदल लागू करण्याची विनंती केली.आता घटनात्मक संस्था असलेल्या एमपीएससीने घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनार्थ स्पर्धा परीक्षार्थी रस्त्यावर उतरले आहेत. ‘स्वायत्त आयोग आमचा आधार’ असे फलक घेऊन परीक्षार्थी आंदोलनाला रस्त्यावर बसले आहेत. एमपीएससीच्या निर्णयाच्या विरोधात आणि समर्थनार्थ असे स्पर्धा परीक्षार्थींचे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation of competitive examinees started in pune demanding changes in state services from 2023 pune print new ccp 14 amy
First published on: 03-02-2023 at 11:43 IST