Premium

पिंपरी : चंद्रकांत पाटलांपेक्षा अजित पवार अधिक चांगलं काम करतील – अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे

अजित पवार हे पालकमंत्री झाल्याने अधिक चांगलं काम करतील, असा विश्वास अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे.

Ajit Gavane on ajit pawar
पिंपरी : चंद्रकांत पाटलांपेक्षा अजित पवार अधिक चांगलं काम करतील – अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असून अजित पवार यांना पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्याची बारकाईने माहिती आहे. त्यामुळे अजित पवार हे पालकमंत्री झाल्याने अधिक चांगलं काम करतील, असा विश्वास अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे. ते लोकसत्ता ऑनलाइनशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पुण्यात वृक्ष संवर्धन, देखभालीसाठी ३६ लाखांची उधळण?

हेही वाचा – पिंपरी : भाजपाने अजित पवारांना पालकमंत्रीपद दिले, पण अधिकारही…; शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांचा खोचक टोला

अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, अजित पवारांना पालकमंत्री केल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची नक्कीच ताकद वाढली आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे यासह जिल्ह्यातील बारीक-सारीक गोष्टी अजित पवारांना माहिती आहेत. त्यांचं विशेष लक्ष जिल्ह्यावर असतं. अजित पवारांकडे काम करण्याचं सातत्य आहे, अधिकाऱ्यांवर पकड आहे. याचा फायदा निश्चितच पिंपरी-चिंचवड शहराला होईल. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. चंद्रकांत पाटलांपेक्षा अजित पवारांना दोन्ही शहरांतील प्रत्येक बारीक गोष्टी माहिती आहेत. त्यामुळेच अजित पवारांचं काम हे चांगलं आहे. असं गव्हाणे म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit gavane comment on making ajit pawar the guardian minister of pune kjp 91 ssb

First published on: 05-10-2023 at 13:19 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा