रोहित माझा पुतण्या आहे. घरातील आहे. माझ्या मुलासारखाच आहे. त्यामुळे रोहितबाबत मी असे काही करणार नाही, अशी स्पष्टोक्ती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात केली. महाराष्ट्र क्रिक्रेट असोसिएशनच्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवार यांनी पडद्यामागून अनेक प्रयत्न केले. हेही वाचा >>> “आम्ही पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार”, विजय वडेट्टीवारांच्या विधानानंतर अजित पवारांनी सुनावलं; म्हणाले, “काही माणुसकी…” अजित दादांनी अनेकांना फोन करून या निवडणूक रोहितला पाडा, अशा सूचना दिल्याचा आरोप ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केला. त्यावर पवार यांनी पुण्यात स्पष्टीकरण दिले. पवार म्हणाले, की नरेश म्हस्के यांना मी ओळखत नाही. कोणीही काहीही बोलेल, त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. मी समोर आणि पाठिमागे एकच बोलतो आणि माझ्या घरातच मी असे काही करणार नाही. रोहित माझा पुतण्या आहे. घरातील आहे. माझ्या मुलासारखाच आहे. त्यामुळे रोहितबाबत मी असे काही करणार नाही.