पिंपरी चिंचवड: पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे – नाशिक महामार्गावर तब्बल २६४ किलो गांजा पकडला आहे. या पकडलेल्या गांज्याची किंमत सुमारे १ कोटी ३३ लाख आहे. चाकण जवळ ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राम व्यंकट पितळे आणि वाहनचालक श्रेयस प्रदीप चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या विरोधात एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे – नाशिक महामार्गावर चाकण जवळ असलेल्या नानेकरवाडी येथे २६४ किलो गांजा घेऊन जाणार टेम्पो पोलिसांनी पकडला. याबाबतची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले, आळंदी फाटा, नानेकरवाडी येथे सापळा रचून पिवळ्या रंगाचा टेम्पो पकडला.
पोलिसांनी झडती घेतल्यानंतर टेम्पोमध्ये १ कोटी ३३ लाखांचा तब्बल २६४ किलो गांजा मिळाला आहे. ही कारवाई पहाटे करण्यात आली. गेल्या वर्षभरातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. याप्रकरणी राम व्यंकट पितळे आणि वाहनचालक श्रेयस चव्हाण ला पोलिसांनी अटक केली आहे. चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई सोमवारी पहाटे करण्यात आली.
हा गांजा कुठे घेऊन जाण्यात येत होता?, कोण मास्टरमाइंड आहे?, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे, गुन्हे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या टीमने कारवाई केली आहे.