पुणे : दागिने बँकेत तारण ठेवून घेतलेल्या कर्जाबाबत विचारणा केल्याने चिडलेल्या पतीने पत्नीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना वानवडी भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी पतीस वानवडी पोलिसांनी अटक केली. संदीप शिवाजीराव घुले (वय ५१, रा. वानवडी) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.
याबाबत घुले यांच्या पत्नीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संदीप यांचे मद्य विक्रीचे दुकान (बिअर शॅापी) आहे. घुले यांनी पत्नीचे दागिने बँकेत तारण ठेवून कर्ज घेतले होते. पत्नीने दागिने तारण ठेवून कर्ज घेतल्याने तिने पतीकडे विचारणा केली.
हेही वाचा : वीज तोडण्याची भिती घालून तीन लाखांचा गंडा ; सायबर चोरट्यांच्या विरोधात गुन्हा
तेव्हा घुले यांनी पत्नीचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न केल्याचे पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी घुले यांना अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.