पुणे : गेल्या काही महिन्यांत पुण्यात कोयता गँगची मोठी चर्चा आहे. अनेक कोयता गँगवर पोलिसांनी कारवाईही केली आहे. याच कोयता गँगचे प्रतिबिंब गणेश विसर्जन मिरवणुकीतही उमटले असून, वैभव मित्र मंडळाने कोयता गँग बाबत जनजागृतीपर देखावा साकारला आहे. या देखाव्याने मिरवणुकीत लक्ष वेधून घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Ganesh Visarjan 2023 : मानाच्या पाच गणपतींचे उत्साहात विसर्जन !

हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या कोयता गँगची राज्यभरात चर्चा झाली. पुण्यात अल्पवयीन मुले, तरुणांनी कोयता घेऊन धमकावणे, हल्ले करणे अशा अनेक घटना गेल्या काही महिन्यांत घडल्या आहे. शहरातील विविध भागातील कोयता गँगची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. काही टोळ्यांवर मोक्का दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोयता गँगबाबत जनजागृती करण्यासाठी वैभव मित्र मंडळाने थेट देखावाच साकारला. त्यात  गणरायासह कोयता गँगला थेट आव्हान दिलेले पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांची छबी आहे. एका कोयत्यामुळे आयुष्य बरबाद करू नका, असे संदेश या देखाव्यावर लिहिण्यात आले आहेत. त्यामुळे या देखाव्याने लक्ष वेधून घेतले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Awareness about koyta gang in ganesha visarjan procession decoration pune print news stj 05 zws