पुणे : पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर, बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर महाविकास आघाडीतर्फे जाहीर सभा झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी, भाजप सरकारवर हल्ला चढवला. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, डॉ. विश्वजित कदम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आदी या वेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरदपवार म्हणाले, की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने शेतकरी, महिला, रोजगार या बाबत दिलेली आश्वासने आणि वस्तुस्थिती यात फरक आहे. २०१५ मध्ये पेट्रोल ७१ रुपये. आज ३६५० दिवस झाल्यावर पेट्रोल १०६ रुपये झाले. ४१० रुपयांचा सिलेंडर ११६० रुपये झाला. तरुणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देणार. दहा वर्षांत नोकऱ्या कमी झाल्या. आता मोदींना सत्ता द्यायची नाही याचा निर्णय घ्यावा लागेल. मोदींवर टीका केली म्हणून झारखंडचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बंगालचे तीन मंत्री तुरुंगात गेले. देशातील लोकशाही उद्ध्वस्त होत आहे. सत्तेचा उन्माद काय असतो हे मोदींनी दाखवले आहे. मोदींचा पराभव करण्यासाठी तयार रहा.

हेही वाचा – पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार

देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाची असल्याचे मोदी सांगतात. पण मनमोहनसिंग यांनी पाया घातला होता. मोदींच्या निर्णयाने अर्थव्यवस्था कोसळली. खतापासून पेट्रोलपंपापर्यंत सगळीकडे मोदींचा फोटो. आमदार पळाले असले तरी मतदार त्यांच्या जागी आहेत. जनता जागा दाखवून देईल, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

हेही वाचा – शिरूरमध्ये ‘महागद्दारी’वरून खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यात खडाजंगी

पुण्यातल्या तीन उमेदवारांकडे देशाचे लक्ष लागले आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार विजयी झाले पाहिजे. त्यानंतर मुख्यमंत्रीही महाविकास आघाडीचा झाला पाहिजे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Be ready to defeat modi attack by sharad pawar pune print news ccp 14 ssb