Premium

पिंपरी- चिंचवडचे नाव बदलून जिजाऊनगर ठेवा!; फ्लेक्सद्वारे भक्ती शक्ती प्रतिष्ठानची मागणी

शहराचे नाव बदलण्याची मागणी २००६-०७ मध्येही करण्यात आली होती

flex in pimpri chichwad
पिंपरी- चिंचवड शहराचं नाव बदलून जिजाऊ नगर ठेवण्यात यावं अशी मागणी भक्ती शक्ती प्रतिष्ठानकडून करण्यात आली

पिंपरी- चिंचवड शहराचं नाव बदलून जिजाऊ नगर ठेवण्यात यावं अशी मागणी भक्ती शक्ती प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे. या आशयाचे फलक पिंपरी- चिंचवड शहरातील विविध भागात लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनाच्या औचित्य साधून ही मागणी करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील अनेक शहरांची नावे बदलण्यात आलेली आहेत. किंबहुना ती बदलण्यात येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता पिंपरी-चिंचवड शहराचे देखील नाव बदलण्याची आग्रही भूमिका भक्ती शक्ती प्रतिष्ठानकडून घेण्यात येत आहे. शहरातील विविध भागात पिंपरी-चिंचवड शहराचे जिजाऊ नगर नाव करण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी भक्ती शक्ती प्रतिष्ठानकडून पिंपरी चिंचवड शहराचे जिजाऊ नगर नाव करण्यात यावे यासाठी फ्लेक्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे शहरांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. पिंपरी- चिंचवड शहराचं नाव बदलण्याच्या चर्चा या अगोदर २००६ -०७ ला झाली होती. तशा दैनिकात बातम्या देखील छापून आल्या. पण, स्थानिकांनी पिंपरी- चिंचवड शहराचे नाव बदलण्यास विरोध केला होता. आता पुन्हा एकदा शहराचे नाव बदलण्याची मागणी होते आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhakti shakti pratishthan demand through flex to change the name of pimpri chinchwad to jijaunagar kjp 91 amy

First published on: 05-06-2023 at 09:20 IST
Next Story
वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा