पुणे : चांदणी चौकातील पूल मध्यरात्री १ ते २ च्या दरम्यान पाडला जाणार ; जिल्हाधिकारी राजेश देशमुख | Bridge at Chandni Chowk will be demolished between 1 am and 2 am Collector Rajesh Deshmukh svk 88 | Loksatta

पुणे : चांदणी चौकातील पूल मध्यरात्री १ ते २ च्या दरम्यान पाडला जाणार ; जिल्हाधिकारी राजेश देशमुख

दिल्ली येथील ट्वीन टॉवर ही इमारत १२ सेकंदात ईडीफाईस कंपनीने पाडली होती.ती इमारत पडतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

पुणे : चांदणी चौकातील पूल मध्यरात्री १ ते २ च्या दरम्यान पाडला जाणार ; जिल्हाधिकारी राजेश देशमुख
जिल्हाधिकारी राजेश देशमुख

दिल्ली येथील ट्वीन टॉवर ही इमारत १२ सेकंदात ईडीफाईस कंपनीने पाडली होती.ती इमारत पडतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.आता हीच कंपनी पुण्यातील चांदणी चौकातील पूल (उद्या ) रविवारी मध्यरात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास पाडण्यात येणार आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिली.

या बाबत जिल्हाधिकारी राजेश देशमुख म्हणाले की,हा पूल पाडण्यापूर्वी २०० मीटरचा परिसर सायंकाळी ६ वाजल्यापासून निर्मनुष्य करण्यास सुरुवात करीत आहोत. हा पूल पाडतांना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये. त्या दृष्टीने ६ हजार ५०० मीटर चॅनल लिंक्स, ७ हजार ५०० वर्ग मीटर जिओ टेक्स्टाईल, ५०० वाळूच्या पिशव्या आणि ८०० वर्ग मीटर रबरी मॅटचा वापर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की,पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी एनएचएआयतर्फे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपयोगात आणली जात आहे. १६ एक्स्कॅव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, ३० टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, २ अग्निशमन वाहन, ३ रुग्णवाहिका, २ पाण्याचे टँकर आणि पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण २१० कर्मचारी संबंधित यंत्रणतर्फे नियुक्त करण्यात आले आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की,वाहतूक नियोजनासाठी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे एकूण ३ पोलीस उपायुक्त, ४ सहायक आयुक्त, १९ पोलीस निरीक्षक, ४६ सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसेच ३५५ पोलीस कर्मचारी असे एकूण ४२७ पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.नागरिकांनी पूल पाडण्याच्या वेळेत चांदणी चौक परिसरात येऊ नये असे आवाहन देखील त्यांनी केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
चांदणी चौक पूल पाडण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी;  १ हजार ३५० डिटोनेटर, २१० कर्मचारी

संबंधित बातम्या

पुणे: मनोरुग्णालयाच्या जागेवरील बेकायदा झोपड्या हटविण्याचे आदेश
पुण्याच्या कात्रजमध्ये मोटारीला वाट न दिल्याने टेम्पोचालकास बेदम मारहाण; मोटारचालक अटकेत
जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
पुणे: आखाती देशात गेलेल्या घरेलू कामगारांच्या सुटकेसाठी ‘आप’चे प्रयत्न
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

व्हिडिओ

ताज्या बातम्या
देशभरातील सर्व आधारकार्डची माहिती त्यांच्याकडे कशी पोहोचते?
मुंबई: थेट न्यायालयाच्या आवारातूनच सहा मोबाइलची चोरी; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला प्रकार
तेजस्विनी लोणारी घराबाहेर पडल्यानंतर अमृता धोंगडे ढसाढसा रडली, नेटकरी म्हणतात “एवढं बदनाम करुन…”
IND vs NZ: टोपी घालून क्षेत्ररक्षण करणाऱ्या भारतीय खेळाडूंवर माजी खेळाडूची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आमच्यावेळी तर…’
विकी कौशलने पहिल्यांदाच मराठी कार्यक्रमात लावली हजेरी; फोटो व्हायरल