लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: पुणे-सातारा रस्त्यावर डी मार्टजवळ झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या व्यावसायिकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. १ मे रोजी मध्यरात्री डी मार्टजवळील एका इमारतीत गृहोपयोगी वस्तू विक्री करणाऱ्या दालनात आग लागून स्फोट झाला होता.
समीर अशोक कोलते असे उपचारा दरम्यान मरण पावलेल्यांचे नाव आहे. सातारा रस्त्यावरील गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री करणाऱ्या दालनात आग लागली होती. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, गॅस गिझर असे साहित्य आगीत जळाले होते. त्या वेळी दुकानात स्फोट झाला होता. स्फोटामुळे तीन मजली इमारतीची पडझड झाली होती. स्फोटात समीर कोलते यांच्यासह दोघे जण जखमी झाले होते.
आणखी वाचा-पिंपरीतील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले ‘हे’ आदेश
गंभीर जखमी झालेल्या कोलते यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सहकारनगर पोलिसांनी दिली होती. दरम्यान, स्फोटानंतर राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. स्फोट नेमका कशामुळे झाला, याची माहिती एटीएस अधिकाऱ्यांनी घेतली होती तसेच तेथून ताब्यात घेण्यात आलेल्या वस्तू न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्या होत्या.
वस्तू विक्री करणाऱ्या दालनात आग लागली होती. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, गॅस गिझर असे साहित्य आगीत जळाले होते. त्या वेळी दुकानात स्फोट झाला होता. स्फोटामुळे तीन मजली इमारतीची पडझड झाली होती. स्फोटात समीर कोलते यांच्यासह दोघे जण जखमी झाले होते.
आणखी वाचा-पुणे: खडकवासला धरणाच्या पाण्यात पाय टाकलात तर होईल खिसा रिकामा