उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिली. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे या वेळी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाने पुण्यातील आमदारांचे रिपोर्ट कार्ड मागवले आहे. त्यामुळे आमदार धास्तावल्याची चर्चा पुण्यातील राजकीय वर्तुळात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘पोपट परत दे, तरच घटस्फोट…’, पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयातील प्रकरण चर्चेत

या बाबत विचारले असता पाटील म्हणाले, की ग्रामपंचायत सदस्यापासून खासदारापर्यंत सर्वांचीच कामगिरी पक्षाकडून तपासली जात असते. अन्य पक्षांप्रमाणे निवडणुकीपुरती कामे न होता पूर्ण कार्यकाळ लोकांसाठी दिला जावा अशी पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे केवळ पुण्यातच नाही, तर सगळीकडूनच कामगिरीचा अहवाल घेऊन तपासला जातो. खासदारांच्या निलंबनाचे पडसाद लोकसभा निवडणुकीत दिसतील असे पवार म्हणत असल्याच्या या प्रश्नावर पाटील म्हणाले, की आशावादी राहणे माणसाला दिलेला नैसर्गिक गुण आहे. तसाच तो पवारांमध्येही आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil comment on sharad pawar over mp suspension issue pune print news ccp14 zws