पुणे : कार्यालयात काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी एका सनदी लेखापालास येरवडा पोलिसांनी अटक केली. अनिरुद्ध सतीश शेठ (वय ४२, रा. डहाणूकर काॅलनी, कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेठ यांच्या कार्यालयात पीडित महिला कामाला होती. शेठ यांनी महिलेला ग्राहकाला सदनिका दाखवायची आहे, अशी बतावणी करुन भूगाव येथे नेले होते. महिलेला खाद्यपदार्थातून गुंगीचे ओैषध देऊन शेठ यांनी बलात्कार केला. मोबाइलवर चित्रीकरण करुन ते समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन शेठ यांनी पुन्हा बलात्कार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास महिला आणि तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. महिलेने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी शेठ यांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक गाताडे तपास करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chartered accountant arrested case of rape of woman yerwada by police pune print news ysh