महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग ; पीएमपी बसमध्ये विनयभंग

पुणे : महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करुन पीएमपी बसमध्ये विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली. या प्रकरणी विकी भास्कर लोंढे (वय २७, रा. धानोरी) याला अटक करण्यात आली. याबाबत २० वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोंढे यांच्या विरोधात विनयभंग, धमकावणे, मारहाण या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग ; पीएमपी बसमध्ये विनयभंग
प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करुन पीएमपी बसमध्ये विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली. या प्रकरणी विकी भास्कर लोंढे (वय २७, रा. धानोरी) याला अटक करण्यात आली. याबाबत २० वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोंढे यांच्या विरोधात विनयभंग, धमकावणे, मारहाण या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार तरुणीला विकी ओळखत आहे. तरुणी पीएमपी थांब्यावर थांबली होती. त्या वेळी दुचाकीस्वार विकी तेथे आला. तरुणीशी बसथांब्यावर अश्लील वर्तन केले. तरुणीने बसमध्ये प्रवेश केला. तेव्हा त्याने पीएमपी बसमध्ये शिरुन तरुणीशी अश्लील वर्तन केले. त्यानंतर तरुणी बसमधून नगर रस्त्यावर आली. तेव्हा विकी दुचाकीवरुन पाठलाग करत तेथे आला. तेथे तरुणीला पुन्हा धमकावून त्याने धक्काबुक्की केली. तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक कुमरे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; एकास अटक
फोटो गॅलरी