पुणे : खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीचा मालकाने विनयभंग केल्याची घटना गुरुवार पेठेत घडली. या प्रकरणी कंपनी मालकाच्या विरोधात खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
बाबर जब्बार खान (वय ४२, रा. साहेर अपार्टमेंट, गुरुवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खान याची वातानुकूलन यंत्रणा दुरुस्ती देखभाल करणारी कंपनी आहे. या कंपनीत तरुणी काम करते. गेल्या काही महिन्यांपासून खान तरुणीला त्रास देत होता. त्याने तिचा विनयभंग केला तसेच तिच्या मोबाइल क्रमांकावर अश्लील संदेश पाठविले. खान याच्या त्रासामुळे तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.
या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायदा (पोक्सो) तसेच विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कुतवळ तपास करत आहेत.
First published on: 26-07-2022 at 14:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Company girl molested employer offense against the owner pune print news ysh