पुणे : नळावर पाणी भरण्याच्या वादातून तिघांनी गर्भवती महिलेला मारहाण केली. मारहाणीत महिलेचा गर्भपात झाला. याप्रकरणी तिघांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वाघोलीतील गोरे वस्ती परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी रवि धोत्रे, शांताबाई रवी धोत्रे यांच्यासह एका अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २५ वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात गोरे वस्तीत सार्वजनिक नळावर पाणी भरण्याच्या वादातून रवि धोत्रे, शांताबाई धोत्रे आणि एका अल्पवयीन मुलाने गर्भवती महिलेला मारहाण केली. तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तिचा गर्भपात झाला.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jul 2023 रोजी प्रकाशित
खळबळजनक! नळावर पाणी भरण्याचा वाद आणि…, मारहाणीमुळे महिलेचा गर्भपात
नळावर पाणी भरण्याच्या वादातून तिघांनी गर्भवती महिलेला मारहाण केली. मारहाणीत महिलेचा गर्भपात झाला.
Written by लोकसत्ता टीम
पुणे

First published on: 25-07-2023 at 19:02 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy over water abortion of a woman due to beating pune print news rbk 25 ysh