पुणे : भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि अनुभवी क्रिकेटपटू मिताली राजने पुन्हा क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, मिताली पुन्हा एकदा मैदानावर फलंदाजी करताना दिसू शकते. महिला क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या मितालीने प्रथमच भारतात होणाऱ्या महिला आयपीएलमध्ये पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिताली महिला आयपीएल खेळणार असे ट्विट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केले आहे. या स्पर्धेची चर्चा दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी, वायकॉम १८ ने लीगचे मीडिया अधिकार ९५१ कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.

हेही वाचा – ब्रेक्झिट किंवा उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रवादी राजकारणाने विज्ञान बिघडू देऊ नका! नोबेलप्राप्त शास्त्रज्ञ प्रा. हेरॉल्ड वर्मस यांचे विधान

हेही वाचा – Breaking: पुण्यातल्या जुन्या बाजारात दुकानांना भीषण आग; ८ दुकाने भस्मसात, जीवितहानी नाही!

मिताली राज याआधी महिला टी२० चॅलेंजमध्येही खेळली आहे. मात्र, गेल्या मोसमात ती खेळली नाही. २०२२ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात ती अखेरची खेळली होती. यानंतर जूनमध्ये तिने समाज माध्यमावर निवृत्तीची घोषणा केली. यानंतर मिताली नुकत्याच झालेल्या पुरुष ट्वेंटी २० विश्वचषक स्पर्धेत समालोचन करताना दिसली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricketer mithali raj might play cricket again pune print news dpb 28 ssb