पिंपरी-चिंचवड : ‘एआय’चा वापर करून अश्लील फोटो बनवण्याची धमकी देणाऱ्या २५ वर्षीय ???प्रियकराला??? सायबर पोलिसांनी अटक केली आहे. २० वर्षीय तरुणीने या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. एकतर्फी प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची माहिती सायबरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वामी यांनी दिली आहे.

चिखली पोलिस ठाण्यात ‘एआय’चा वापर करून अश्लील फोटो बनविण्याची धमकी सुदर्शन सुनील जाधवने दिली होती. सुदर्शन आणि तक्रादार तरुणी एकाच कंपनीत काम करतात. सुदर्शनचं तक्रारदार तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं. ???त्याने तरुणीच्या नावाने बनावट इन्स्टग्राम सुरू केलं.

तरुणीचे फोटो वापरले, तिच्याशी त्याद्वारे बोलण्याचा प्रयत्न केला.???(की सुदर्शनने एका तरुणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केलं, आपले म्हणून कुठल्यातरी दुसऱ्या तरुणीचे फोटो वापरले आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला) सुदर्शन तरुणीला नाहक त्रास देत होता. तरुणीने पोलिसांत जाण्याची धमकी दिली.

यावरून सुदर्शनने एआयचा वापर करून तरुणीच्या फोटोचा ड्रेस बदलून तिला पाठवला आणि अशाच पद्धतीने एआयचा वापर करून अश्लील फोटो बनविण्याची धमकी दिली. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात तरुणीने तक्रार दिली. सायबर पोलिस आरोपीचा शोध घेत होते. अखेर सायबर पोलिसांनी सुदर्शन सुनील जाधवला चाकणमधून अटक केली. त्याने हे सर्व एकतर्फी प्रेमप्रकणातून केल्याचं कबूल केलं आहे, अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे.