पिंपरी- चिंचवड: भीषण अपघातात सिम्बॉयसीस कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. पहाटे पावणे सहाच्या सुमारास समोरील कंटेनरला भरधाव स्विफ्टने भीषण धडक दिली. घटनेत दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन जण जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
सिद्धांत आनंद रा. झारखंड आणि दिव्यराज सिंह राठोड रा. राजस्थान अशी मृत्यू झालेल्या दोघांची नाव आहेत. काल सिम्बॉयसीस येथील बी.बी.ए ला शिक्षण घेत असलेले चार मित्र लोणावळा परिसरात फिरण्यासाठी गेले होते. पहाटे परतत असताना देहूरोड येथे इदगाह मैदानाजवळ भीषण अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर तातडीने पोलीस पोहचले. कंटेनरचे इंडिकेटर बंद असल्याने अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातात स्विफ्ट गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.